सुशांतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर? स्वामींची आता 'एनआयए' तपासाची मागणी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असून, आता भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एनआयए तपासाची मागणी केली आहे.
stun gun used in sushant singh rajput death claims twitter user
stun gun used in sushant singh rajput death claims twitter user

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या मृत्यूला दोन महिने होत असताना वेगवेगळे दावे केले जात आहेत. सुशांतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी आता भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपास करावा, अशी मागणी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सुशांतच्या मृत्यूला दोन महिने होत आले असून, या प्रकरणी वेगवेगळे दावे केले जात आहेत. सुशांतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर करण्यात आला, असे  एका ट्विटर यूजरने म्हटले आहे. या यूजरने या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि शिवसेनेचे नेते युवा नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केले आहेत. त्याने म्हटले आहे की, मी स्टन गनबाबत खूप काही वाचले आहे. त्यांचा कशाप्रकारे वापर होतो हेही मी वाचले. सुशांतच्या गळ्यावरील खुणा पाहता त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी स्टन गनचाच वापर केला होता. 

या मुद्द्यावरुन सुब्रह्मण्यम स्वामी आता रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आता या प्रकरणी एनआयएने तपास करावा, अशी मागणी केली आहे. स्वामी यांनी म्हटले आहे की, या गन भारतात कोठून आल्या हे शोधायला हवे. अरबी समुद्राच्या बाजूच्या शेजारील देशातून त्यांची तस्करी करण्यात आली का याचा तपास करायला हवा. यासाठी एनआयएने तपासात उतरावे. 

रिया चक्रवर्ती हिने पाटण्यातील एफआयआर मुंबईत वर्ग करावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 ऑगस्टला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महाराष्ट्र, बिहार आणि रिया चक्रवर्ती यांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com