Alahabad High Court: न्यायालयाचा अजब निर्णय ! बलात्कार पिडीतेच्या कुंडलीतील मंगळ शोधण्याचाच दिला आदेश

UP News : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सध्या वादात सापडला आहे.
Alahabad High Court | UP News
Alahabad High Court | UP News Sarkarnama

Uttar Pradesh News : भारतात न्यायालयाला न्यायाचं मंदिर म्हटलं जातं. पण अलाहाबाद उच्च न्यायालयाचा (Allahabad High Court)निर्णय सध्या वादात सापडला आहे. या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

अधिक माहितीनुसार, बलात्कार प्रकरणातील आरोपीने संबंधित पिडीत तरुणीला 'मंगळ' असल्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी अलाहाबाद न्यायालयाने लखनऊ विद्यापीठातील ज्योतिष विभागाच्या विभाग प्रमुखांना संबंधित तरुणीला कुंडलीत खरचं मंगळ आहे की नाही हे तपासून त्याचा अहवाल तीन आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले. ( National News)

Alahabad High Court | UP News
Ajit Pawar Said : नितीन गडकरींमुळे भाजप विदर्भात सर्वदूर पोहोचली !

या प्रकरणातील संशयित आरोपी अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक आहे. पिडीतेशी ओळख झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, पण अचानक आरोपीने पीडितेच्या कुंडलीत मंगळ असल्याचे सांगत लग्नास नकार दिला. (Court News)

या प्रकरणी आज अलाहाबाद न्यायालयात सुनावणी झाली. आपल्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नसल्याचा दावा करत पीडितेने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. पण आरोपीच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढत “पीडित तरुणीच्या कुंडलीत मंगळ असल्याने हा विवाह होऊ शकत नाही”, असा युक्तीवाद केला. तर, पीडित तरुणीच्या कुंडलीत मंगळ नसून लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे, पीडितेच्या वकीलांनी रवींद्र कुमार सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. (Uttar Pradesh News)

Alahabad High Court | UP News
Shinde Group Offers Pankaja Munde: शिंदे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडेंना पायघड्या, पक्षात आल्यास स्वागत...

या सुनावणी नंतर दोन्ही पक्षांचे दावे लक्षात घेता अलाहाबाद न्यायालयाने लखनऊ विद्यापीठातील ज्योतिषशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुखांना पीडित मुलीच्या कुंडलीत खरंच मंगळ आहे की नाही? हे तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर, हे तपासण्यासाठी पक्षकारांनी त्यांच्या पत्रिका 10 दिवसांत विभाग प्रमुखांकडे सादर करण्याचे आणि विभागप्रमुखांनी ते तपासून त्याचा अहवाल तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com