नुपूर शर्मा- नवीन जिंदल यांच्या विरोधात देशभर निदर्शनांचा वणवा : मुस्लिम समाज आक्रमक

Nupur Sharma | BJP | Delhi : मुंबई, सोलापूरमध्येही संतप्त जमावाची निदर्शन
Nupur Sharma
Nupur Sharma Sarkarnama

नवी दिल्ली : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबदद्ल भाजपचे (BJP) निलंबित प्रवक्ते नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी दिल्ली, मुंबई, सोलापूर, लखनौ, मुरादाबाद, रामपूर, हैदराबाद अशा देशाच्या अनेक शहरांत आज (शुक्रवारी) हजारोंच्या संतप्त जमावाने निदर्शन केली. या काळात भडकलेली निदर्शनांची धग देशभरात वाढत चालली आहे. शुक्रवारची जुम्मा नमाज अदा केल्यानंतर संतप्त जमावाने ही निदर्शने केली. (Nupur Sharma Latest News)

नवी मुंबई (Mumbai) भागात शर्मांच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात मुस्लिम तरुणांबरोबर महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. याशिवाय सहारनपूर, प्रयागराज व देवबंद येथे उग्र जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. कोलकत्या जवळील हावडा येथे जाळपोळ झाली. दरम्यान दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीच्या बाहेरही हजारो संतप्त तरूण व महिलांनी जोरदार निदर्शने करण्यात आली. मात्र दिल्लीत दुपारच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

‘‘जामा मशिदी बाहेरच्या निदर्शनांना मशिदीच्या व्यवस्थापनाचा काहीही संबंध नव्हता, हे कदाचित (असदुद्दीन) ओवैसी यांचे लोक असतील'‘ अशा शब्दांत शाही इमाम अहमद बुखारी यांनी, या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी, ही निदर्शने ही अपवाद वगळता लोकशाही पध्दतीने व उस्फूर्तपणे झाल्याचा दावा केला आहे. (Nupur Sharma Latest News)

दिल्लीच्या जामा मशिदीत जुम्मा ची नमाज अदा करण्यास हजारो भाविक येत असतात. आजची नमजा पार पडल्यावर मशिदीच्या क्र. १ च्या प्रवेशद्वारासमोर अचानक मोठ्या संख्येने लोक जमले व त्यांनी शर्मा व जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दिल्ली पोलिसांच्याही विरोधात घोषमा देण्यात आल्या.

शान-ए-नबी यांचा म्हणजे प्रेषितांचा अपमान पृथ्वीवरील कोणताही मुसलमान सहन करणार नाही असेही यातील अनेक तरूण ओडरून सांगत होते. काही मिनिटांतच पोलिस व अर्धसैनिक दलाच्या जवानांची मोठ्या संख्येने तैनाती या भागात झाली. पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. दरम्यान अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. (Nupur Sharma Latest News)

काल याबाबत सोशल मिडीयावर एक निनावी मेसेज व्हायरल झाला होता. या व्हायरल मेसेजवर कोणत्याही संघटनेचे नाव नव्हते. मात्र त्यात शर्मा, जिंदाल यांच्या अटकेसाठी भारत बंदचे व रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले गेले होते. त्याचे उगमस्थानही दिल्ली आहे का, याचाही दिल्ली पोलिस तपास करत आहेत. या भडकाऊ व्हायरल मेसेजचीही दिल्ली पोलिस बारकाईने चौकशी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com