राष्ट्रपतीपद उमेदवारीबाबत नकवींच सूचक वक्तव्य म्हणाले, सितारों के आगे जहाँ और भी है!

Presidential election|Mukhtar Abbas Naqvi : सर्वोच्च पदासाठी मोदी मुस्लिम उमेदवाराचे नाव देऊ शकतात अशी चर्चा आहे.
राष्ट्रपतीपद उमेदवारीबाबत नकवींच सूचक वक्तव्य म्हणाले, सितारों के आगे जहाँ और भी है!
Mukhtar Abbas naqvi Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षातील, (BJP) टीम मोदीमधील सध्याचा एकमेव मुस्लिम चेहरा असलेले केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) अनुकूल असल्याची चर्चा जोरात आहे. स्वतः नक्वी यांनी प्रथमच यावर भाष्य करताना,‘‘सितारों के आगे जहां और भी है,, अभी इश्क के इम्तेहान और भी हैं," अशी काव्यात्मक प्रतीक्रिया दिली व मी फार आशावादी माणूस आहे असेही सूचकपणे सांगितले.(Mukhtar Abbas naqvi Latest Marathi News)

Mukhtar Abbas naqvi Latest News
'अग्निपथ' योजनेला विरोध होताच भाजपचे मुख्यमंत्री झाले सक्रिय...

१८ जुलै रोजी मतदान व २१ जुलै रोजी मतमोजणी होणाऱया राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election) प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी राज्यसभा सचिवालयातून १० जणांनी अर्ज नेल्याचे समजते. १० ऑगस्टपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक होणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, अनेक भाजपेतर पक्षांची साथ त्यांना मिळू शकत नसल्याचे दिसते. संख्याबळ भाजप आघाडीच्या बाजूने असल्याचे सत्तारूढ नेत्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी हेच भाजपचा उमेदवार ठरविणार आहेत व ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

नुपूर शर्मा प्रकरणामुळे आखाती देशांनी रोष व्यक्त करताच सारा देशच बचावाच्या पवित्र्यात उभा राहिल्याचे चित्र जागतिक पातळीवर उभे राहिले. त्यावर उतारा म्हणून दोनपैकी किमान एका सर्वोच्च पदासाठी मोदी मुस्लिम उमेदवाराचे नाव देऊ शकतात अशी चर्चा आहे. ती खरी ठरली तर भाजपकडे त्यासाठी नक्वी हे सर्वोच्चम पर्याय आहेत. नुपूर प्रकरणी त्यांनी जी आघाडी सांभाळली त्यामुळे भाजप नेतृत्व 'प्रसन्न' झाल्याचे सांगितले जाते. मात्र नक्वी यांची सक्रियता पाहता त्यांना राज्यसभेची जबाबदारी असणारे उपराष्ट्रपतीपद दिले जाईल, असेही जाणकार मानतात.

Mukhtar Abbas naqvi Latest News
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

स्वतः नक्वी यावर अद्याप बोलण्याचे टाळत होते. मात्र एका वृत्तवाहिनीच्या प्रश्नावर त्यांनी काल याबाबतचे मौन सोडले. 'आपण फार आशावादी आहोत', असे स्पष्ट करताना त्यांनी सितारों के आगे, हा शेर उधृत केला. ते म्हणाले की, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपद या दोन्ही फार वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी भाजप नेतृत्व योग्य वेळी उमेदवार जाहीर करेल. मी सध्या त्यात नाही.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या व मोदी यांच्या काळातही सरकारमध्ये सक्रिय असणारा अखेरचा दुवा म्हणजे नक्वी आहेत. मात्र याच नक्वींना भाजपने राज्यसभेचे व नंतर लोकसभा पोटनिवडणणुकीचेही तिकीट दिले नाही. तरीही त्यांच्या चेहऱयावरील हास्य जाणकारांना सूचक वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in