Gujrat Politics : आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना गुजरात पोलिसांकडून अटक

गुजरातमध्ये नवीन सरकार स्थापन होऊन 10 दिवसही उलटले नाहीत
Gopal Italia | AAP
Gopal Italia | AAP

Gujrat Politics : गुजरातचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. गुजरात विधानसभा निवडणुका संपल्या आणि नवीन सरकार स्थापन होऊन 10 दिवसही उलटले नसताना मंगळवारी (२१ डिसेंबर) आप'चे (AAP) नेते गोपाल इटालियाला (Gopal Italia) अटक करण्यात आली. पण अटकेनंतर काही वेळातच जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. भावनगरच्या उमराळा पोलिसांनी गोपाल इटालियाला अटक केली होती. गोपाल इटालिया यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

गुजरातमधील आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी आपल्या अटकेची माहिती देण्यासोबतच भाजपवरही (BJP) निशाणा साधला. ''विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त करून पूर्ण बहुमत दिले होते. आता नवीन सरकारने आपले काम सुरू केले आहे. पण भावनगर पोलिसांनी आज मला अटक केली. माझ्या आजीचे काल निधन झाले. संपूर्ण कुटुंब दुःखी आहे, पण मला अटक करण्यात आली आहे. कदाचित या कामासाठी बहुमत मिळाले असेल.''असे ट्विट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Gopal Italia | AAP
Anil Deshmukh : स्वीय सहायकासोबतच देशमुख आज कारागृहाबाहेर येणार का ?

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही गुजरात पोलिसांनी गोपाल इटालियाला ताब्यात घेऊन जवळपास तीन तास चौकशी केली होती. कोठडीतून सुटल्यानंतर त्यांनी भाजप, दिल्ली पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. इतकेच नाही तर गुजरात निवडणुकीपूर्वी गोपाल इटालिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भाजपने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यामध्ये इटालिया महिलांना मंदिरात न जाण्याचा सल्ला देताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने इटालियाला समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com