राजीनामा मागितला नाही, मीच दिला! काही तासातच चुकीची दुरूस्ती  - State Minister Babul Supriyo resigns from Union Cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

राजीनामा मागितला नाही, मीच दिला! काही तासातच चुकीची दुरूस्ती 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करण्यात आला आहे. पण काही कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील खासदार बाबूल सुप्रियो यांचाही समावेश आहे. राजीनाम्याची माहिती देताना त्यांनी सुरूवातीला आपल्याला राजीनामा मागण्यात आल्याची फेसबुक पोस्ट केली होती. पण त्यात त्यांनी काही तासातच बदल केला आहे. (State Minister Babul Supriyo resigns from Union Cabinet)

सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्रीपद होते. त्यांनीही आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी फेसबूकवरून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. आपल्याला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते, त्यानुसार मी राजीनामा दिला आहे, अशी माहिती त्यांनी सुरूवातीला या पोसटमध्ये दिली होती. पण यामध्ये त्यांनी काही तासांतच बदल केला आहे. 

हेही वाचा : बदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रिपद राखलं

पहिल्या फेसबूक पोस्टमध्ये सुप्रियो म्हणतात की, होय, जेव्हा धूर असतो तेव्हा कुठे ना कुठे आग लागलेली असते. मला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते. मला मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभाव मानतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग न लागू देता मी आज जात आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला राजीनामा द्यावा लागला याचं दु:ख आहे पण इतरांसाठी खूप आनंद होत आहे. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत, असं सुप्रियो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ही चूक सुधारत आपल्याला राजीनामा मागितला नाही, आपणच दिल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधी कालपासून12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्ष वर्धन, शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

तसेच काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत. त्यामध्ये हरदीप सिंग पुरी, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर आदींचा समावेश आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याचे दिसते. आज 43 जणांचा शपथविधी होणार असून त्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. 

यांना मिळाली संधी :

1. नारायण राणे (महाराष्ट्र), 2. सर्वानंद सोनोवाल, 3. डॅा. विरेंद्र कुमार
4. जोतिरादित्य शिंदे, 5. रामचंद्र प्रसाद सिंग, 6. अश्विनी वैष्णव
7. पशुपती कुमार पारस, 8. किरण रिजिजू, 9. राज कुमार सिंग
10. हरदिप सिंग पुरी, 11. मनसुख मांडलीय, 12. भूपेंद्र यादव
13. पुरषोत्तम रुपाला, 14. अनुराग ठाकूर, 15. पंकज चौधरी
17. अनुप्रिया सिंग पटेल, 18. डॅा. सत्यपाल सिंग बघेल, 19. राजीव चंद्रशेखर
20. शोभा करंदालजे, 21. भानू प्रताप सिंग वर्मा, 22. दर्शना विक्रम जरदोश
23. मिनाक्षी लेखी, 24. अन्नपुर्णा देवी, 25. ए. नारायणस्वामी
26. कौशल किशोर, 27. अजय भट, 28. बी. एल. वर्मा, 29. अजय कुमार
30. देवुसिंह चौहान, 31. भगवंत खुबा, 32. कपिल पाटील (महाराष्ट्र)
33. प्रतिमा भौमिक, 34. डॅा. सुभाश सरकार, 35. डॅा. भागवत कराड (महाराष्ट्र)
36. डॅा. राजकुमार रंजन सिंग, 37. डॅा. भारती पवार (महाराष्ट्र)
38. बिश्वेश्वर टुडू, 39. शंतनू ठाकूर, 40. डॅा. मुंजापरा महेंद्रभाई
41. जॅान बारला, 42. डॅा. एल. मुरूगन, 43. निसिथ परमाणिक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख