विंबल्डनमध्ये 'स्टँडिग ओव्हेशन' पण खेळाडूसाठी नव्हे तर सारा गिल्बर्टसाठी! - standing ovation in wimbledon for vaccine scientist sarah gilbert | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

विंबल्डनमध्ये 'स्टँडिग ओव्हेशन' पण खेळाडूसाठी नव्हे तर सारा गिल्बर्टसाठी!

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जून 2021

विंबल्डन स्पर्धेत एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. स्टेडिअममधील प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवून एका व्यक्तीला मानवंदना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

लंडन : विंबल्डन स्पर्धेत (Wimbledon) एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. स्टेडिअममधील प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवून एका व्यक्तीला मानवंदना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परंतु, ही मानवंदना टेनिसपटूसाठी नाही तर एका महिलेसाठी होती. विषाणूतज्ज्ञ असलेल्या या महिलेचे नाव सारा गिल्बर्ट (Sarah Gilbert) असून ऑक्सफोर्ड-स्ट्राझेनेका लस विकसित करण्याऱ्या शास्त्रज्ञांपैकी ती एक आहे. सिरम इन्स्टिट्यूट (SII) याच कोव्हिशिल्ड (Covishield) लशीचे उत्पादन करीत आहे. 

यंदा राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना विषाणू प्रतिबंधक लशीच्या निर्मात्यांना व्हीआयपी रॉयल बॉक्समध्ये बसून सामने पाहण्यासाठी विंबल्डन स्पर्धेच्या आयोजकांनी निमंत्रित केले होते. यात सारा गिल्बर्ट यांचाही समावेश होत्या. त्यांच्यासोबत ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रमुख सर अँड्र्यू पोलार्ड हेसुद्धा होते. नोव्हाक जोकोविच सर्व्हिस करीत असतानाच उद्घोषकांनी घोषणा केली की, कोर्टात खेळाडूंचे स्वागत करण्यापूर्वी या कठीण काळात सर्वांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रयत्व करणाऱ्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. 

हेही वाचा : अखेर प्रतीक्षा संपली...चार दशकानंतर मिळाली महिला मंत्री 

यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून व टाळ्या वाजवून सारा न पोलार्ड यांनी मानवंदना दिली. सुमारे एक मिनिट उभे राहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडात केला. या घटनेची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नोव्हाक जोकोविच व जॅक ड्रेपर यांच्यातील सामन्याचे समालोचन करणारे माजी टेनिसपटू बोरिस बेकर यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीचा हा क्षण अत्यंत भावुक आहे, असल्याची प्रतिक्रिया दिली. 

सारा गिल्बर्ट या आयरिश वंशाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म एप्रिल १९६२मध्ये झाला. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी मलेरियावरील लस शोधणाऱ्या गटासह काम केले होते. त्यानंतर मलेरिया आणि इबोलासारख्या घातक आजारांवर लस विकसित करण्यातही त्यांनी योगदान दिले. नंतर ब्रिटिश सरकारने कोरोनाची लस तयार करण्याची जबाबदारी सारा यांच्यावर सोपविली.त्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात लसीकरणशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख