इमारतीला आंदोलकांनी वेढा घालताच लपून बसलेल्या खासदाराची गोळ्या झाडून आत्महत्या

काही दिवसांपासून राजधानी कोलंबोसह अन्य शहरांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
इमारतीला आंदोलकांनी वेढा घालताच लपून बसलेल्या खासदाराची गोळ्या झाडून आत्महत्या
MP Amarakeerthi Athukorala Sarkarnama

कोलंबो : श्रीलंकेत हिंसाचाराच्या घटनानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पंतप्रधानांच्या पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सरकारविरोधी आंदोलकांच्या भीतीमुळे हे खासदार एका इमारतीत लपून बसले होते. पण आंदोलकांनी घातलेल्या वेढ्यामुळे त्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Sri lanka Latest Marathi News)

श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकिर्ती अतुकोरला (Amarakeerthi Athukorala) यांचा मृत्यू झाला आहे. आंदोलन सुरू असलेल्या नितंबुवा शहरातून जात असताना त्यांच्या गाडीसमोर आंदोलक आले होते. यावेळी त्यांनी आपल्याकडील पिस्तुलातून दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यातील एका मृत्यू झाला आहे. त्यानंतर ते आपली गाडी सोडून पळाले. जवळच्याच एका इमारतीत त्यांनी आसरा घेतला होता. (Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa resigns)

MP Amarakeerthi Athukorala
लंका पेटली! हिंसाचारानंतर पंतप्रधानांचा तडकाफडकी राजीनामा

काहीवेळातच या इमारतीला हजारो आंदोलकांनी वेढा घातला. त्यामुळे घाबरलेल्या खासदाराने पिस्तूलातून स्वत:वरच गोळी झाडत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कोलंबोत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 138 जण जखमी झाले असून त्यांना कोलंबो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संचारबंदी असली तरी अनेक नागरिक रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. दोन दिवसांपासून राजधानी कोलंबोसह अन्य शहरांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आधीच आर्थिक संकट ओढवलेलं असताना आता राजकीय संकटही आले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी दुसऱ्यांदा आणीबाणी लागू केली आहे. त्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. देशातील नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी राष्ट्रपती भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर सरकारच्या समर्थकांनी हल्ला केला होता. दोन्ही गटात उडालेल्या वादानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

MP Amarakeerthi Athukorala
मोठी बातमी : द्रेशद्रोहाच्या कायद्यात बदल होणार? मोदी सरकारचा दोन दिवसांतच यू-टर्न

आंदोलकांकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या घटनेत आतापर्यंत किमान 20 जण जखमी झाले आहेत. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राजीनामा देणार असल्याचे वृत्त शनिवारीच आले होते. त्यानुसार सोमवारी त्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा ट्विटरवरून केली. त्यामुळे आता देशात राजकीय संकट निर्माण झालं आहे.

दरम्यान, चार मे रोजी श्रीलंकेतील मुख्य विरोधी पक्षाने पंतप्रधान राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरोधा अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. देश आर्थिक संकटातून जात असताना पंतप्रधानांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली नाही, असा विरोधकांचा आरोप होता. त्यानंतर राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

आता राष्ट्रपतींकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेले हंगामी सरकारचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. पण विरोधकांकडून त्याला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एसजेबी पक्षाने त्यांचे नेते सजिथ प्रेमदासा हे पंतप्रधान पद स्वीकारणार नाही, अशी घोषणा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.