लंका पेटली! हिंसाचारानंतर पंतप्रधानांचा तडकाफडकी राजीनामा

मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.
Mahinda Rajapaksa Latest News
Mahinda Rajapaksa Latest NewsSarkarnama

कोलंबो : मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. दोन दिवसांपासून राजधानी कोलंबोसह अन्य शहरांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आधीच आर्थिक संकट ओढवलेलं असताना आता राजकीय संकटही आले आहे. हिंसाचाराच्या घटनानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. (Mahinda Rajapaksa Latest Marathi News)

श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी दुसऱ्यांदा आणीबाणी लागू केली आहे. त्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. देशातील नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी राष्ट्रपती भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर सरकारच्या समर्थकांनी हल्ला केला होता. दोन्ही गटात उडालेल्या वादानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa resigns)

Mahinda Rajapaksa Latest News
मोठी बातमी : द्रेशद्रोहाच्या कायद्यात बदल होणार? मोदी सरकारचा दोन दिवसांतच यू-टर्न

आंदोलकांकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या घटनेत आतापर्यंत किमान 20 जण जखमी झाले आहेत. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राजीनामा देणार असल्याचे वृत्त शनिवारीच आले होते. त्यानुसार सोमवारी त्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा ट्विटरवरून केली. त्यामुळे आता देशात राजकीय संकट निर्माण झालं आहे.

दरम्यान, चार मे रोजी श्रीलंकेतील मुख्य विरोधी पक्षाने पंतप्रधान राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरोधा अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. देश आर्थिक संकटातून जात असताना पंतप्रधानांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली नाही, असा विरोधकांचा आरोप होता. त्यानंतर राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

आता राष्ट्रपतींकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेले हंगामी सरकारचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. पण विरोधकांकडून त्याला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एसजेबी पक्षाने त्यांचे नेते सजिथ प्रेमदासा हे पंतप्रधान पद स्वीकारणार नाही, अशी घोषणा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com