श्रीलंकेत आगडोंब! हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान कुटुंबीयांसह नौदल तळावर लपले

देशात सरकारविरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला
Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisis Sarkarnama

कोलंबो : श्रीलंकेच्या (Sri Lanka) पंतप्रधानपदाचा (Prime Minister) महिंदा राजपक्ष (Mahinda Rajpaksha) यांनी राजीनामा दिला असून, यानंतर देशात सरकारविरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. आंदोलकांनी राजपक्ष कुटुंबाच्या सरकारी निवासस्थानासोबत वडिलोपार्जित घरालाही आग लावली आहे. यामुळे राजपक्ष कुटुंब नौदल तळावर लपून बसले आहे. मागील 24 तासांत विविध ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाले आहेत. (Sri Laka Crisis News Updates)

महिंदा राजपक्ष आणि त्यांचे कुटुंब कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नौदलाच्या त्रिंकोमाली नौदलाच्या तळावर लपून बसले आहे. हजारोच्या संख्येने आंदोलकांनी काल पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालत पेट्रोल बॉम्ब फेकले होते. तसेच, निवास्थानाबाहेरील गाड्याही पेटविल्या होत्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना गोळीबार करावा लागला होता. श्रीलंकेच्या सैनिकांनी आज सकाळी महिंदा राजपक्ष आणि त्यांच्या कुटुंबांना घराबाहेर काढून नौदलाच्या तळावर हलवले. यानंतर आंदोलकही नौदलाच्या तळावर पोचले आहेत. हा तळ राजधानी कोलंबोपासून २७० किलोमीटर अंतरावर आले.

Sri Lanka Crisis
अडचणीत आलेल्या नारायण राणेंची अटक पुन्हा टळली

महिंदा राजपक्ष यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेतील स्थिती आणखी बिघडली आहे. श्रीलंकेत राजपक्ष सरकारने अनेक ठिकाणी सैनिकांना पाचारण केले असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महिंदा राजपक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत २०० हून अधिक जण जखमी झाले असून ८ जण ठार झाले आहेत. यात सत्ताधारी खासदाराचाही समावेश आहे. महिंदा राजपक्ष यांचे पंतप्रधान निवासस्थान असलेल्या टेम्पल ट्री आंदोलकांनी पेटवले. राजपक्ष यांच्या संग्रहालयाचीही जमावाने तोडफोड केली. कुरुनगला येथील राजपक्ष कुटुंबाचे असलेल्या कार्यालयालाही आग लावण्यात आली. महिंदा राजपक्ष यांच्या मुलाच्या निकटवर्तीयाचे हॉटेलही पेटवून देण्यात आले. या हॉटेलमध्ये उभी असलेली लॅम्बॉर्गिनी मोटारही जमावाने जाळली.

Sri Lanka Crisis
राज ठाकरे येतील तेव्हाच पक्ष कार्यालयात जाणार! नाराज वसंत मोरेंचा निर्धार

श्रीलंकेतील विदेशी नागरिकांना संरक्षण दिले असून, ते सुरक्षित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राजपक्ष कुटुंबाच्या जवळच्या नेत्यांची वाहने लोक जाळत आहेत. यात दोन बसचा समावेश आहे. आंदोलकांनी जाळपोळ करीत गाड्या तलावात ढकलल्या. राजपक्ष कुटुंबांच्या समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केला ती बस आज जाळण्यात आली. महाराजम्मा भागात जमावाने सरकार समर्थक नेत्याच्या गाडीवर बुलडोझर फिरवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com