मोठी बातमी : श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांसह इतर राजकारण्यांना न्यायालयाचा दणका!

महिंदा राजपक्ष अन् त्यांचे कुटुंबीय नौदल तळावर लपले
मोठी बातमी : श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांसह इतर राजकारण्यांना न्यायालयाचा दणका!
Mahinda Rajapaksa Sarkarnama

कोलंबो : श्रीलंकेच्या (Sri Lanka) पंतप्रधानपदाचा (Prime Minister) महिंदा राजपक्ष (Mahinda Rajpaksha) यांनी राजीनामा दिला असून, यानंतर देशात सरकारविरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. यामुळे राजपक्ष कुटुंब नौदल तळावर लपून बसले आहे. यातच आता न्यायालयाने राजपक्ष यांना न्यायालयानं दणका दिला आहे. राजपक्ष यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतर 15 राजकीय सहकाऱ्यांना देश सोडण्यास मनाई केली आहे.. (Sri Laka Crisis News Updates)

कोलंबोतील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं हा आदेश दिला आहे. सरकारविरोधी आंदोलकांवर बळाचा वापर करून हिंसाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने राजपक्ष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना हा दणका दिला आहे. यासोबत या हिंसाचाराचा तपास करण्याचे आदेशही न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. श्रीलंकेत 9 मे रोजी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हल्ले झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी याला प्रत्युत्तर दिले. यातून हिंसाचार होऊन 9 जणांचा मृत्यू तर मोठ्या प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नुकसान करण्यात आले होते. न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे राजपक्ष, त्यांचा राजकारणी मुलगा अमल आणि इतर 15 सहकाऱ्यांना देश सोडता येणार नाही.

Mahinda Rajapaksa
शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना न्यायालयाचा दणका; तिहार कारागृहातील मुक्काम वाढला

महिंदा राजपक्ष आणि त्यांचे कुटुंबीय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नौदलाच्या त्रिंकोमाली नौदलाच्या तळावर लपून बसले आहेत. हजारोच्या संख्येने आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालत पेट्रोल बॉम्ब फेकले होते. तसेच, निवास्थानाबाहेरील गाड्याही पेटविल्या होत्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षारक्षकांना गोळीबार करावा लागला होता. त्यानतंर श्रीलंकेच्या सैनिकांनी महिंदा राजपक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढून नौदलाच्या तळावर हलवले. हा तळ राजधानी कोलंबोपासून 270 किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर आंदोलकही नौदलाच्या तळावर पोचले आहेत. त्यांनी या तळाला वेढा घातला आहे.

Mahinda Rajapaksa
मोठ्या राजकीय नाट्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांची विधानसभेत एंट्री अन् म्हणाले...

महिंदा राजपक्ष यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेतील स्थिती आणखी बिघडली आहे. श्रीलंकेत राजपक्ष सरकारने अनेक ठिकाणी सैनिकांना पाचारण केले असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महिंदा राजपक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत 200 हून अधिक जण जखमी झाले असून 9 जण ठार झाले आहेत. यात सत्ताधारी खासदाराचाही समावेश आहे. महिंदा राजपक्ष यांचे पंतप्रधान निवासस्थान असलेल्या टेम्पल ट्री आंदोलकांनी पेटवले होते. राजपक्ष यांच्या संग्रहालयाचीही जमावाने तोडफोड केली होती. कुरुनगला येथील राजपक्ष कुटुंबाचे असलेल्या कार्यालयालाही आग लावण्यात आली होती. महिंदा राजपक्ष यांच्या मुलाच्या निकटवर्तीयाचे हॉटेलही पेटवून देण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.