निकालाआधीच योगींना गोरखपूरला पाठविण्याची घाई; विमानाचे तिकिट केले बुक!
Yogi Adityanathsarkarnama

निकालाआधीच योगींना गोरखपूरला पाठविण्याची घाई; विमानाचे तिकिट केले बुक!

निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे

लखनो : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजप (BJP) दहा मार्च रोजी हद्दपार होणार, मी येतोय, असे ट्वीट समाजवादी पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासाठी गोरखपूरचे विमानाचे तिकीटच बुक केले आहे. तसेच, त्यांनी तिकीट सुरक्षित ठेवण्याचाही सल्ला दिला आहे.

 Yogi Adityanath
पाच राज्यांच्या निवडणुकीचा संग्राम; पक्षीय बलाबल काय? हे मुद्दे गाजणार

सपा नेते आयपी सिंह यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले, ''१० मार्चला सामान्यांचा दिवस असेल, १० मार्चला राज्यात सत्याचा सूर्य उगवेल आणि सपा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल'' मी योगी आदित्यनाथजींसाठी ११ मार्चला लखनऊ ते गोरखपूरचे रिटर्न तिकीट बुक केले आहे, हे तिकीट तुमच्याकडे ठेवा, कारण पराभवानंतर भाजपही तुम्हाला विचारणार नाही, असा खोचक टोला लगावला आहे.

आयपी सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आयपी सिंह यांच्यावर हल्ला चढवला आहे तर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते त्यांना साथ देत आहेत. निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाची उत्तर प्रदेशातील (UP election 2022) सत्ता येत्या दहा मार्च रोजी संपुष्टात येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शनिवारी केला होता. या लढाईसाठी समाजवादी पक्ष पूर्ण सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

समाजावादी पक्ष या निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत आहे. व्हर्च्युअल प्रचारासाठीही आमची तयारी आहे. आमच्या काळात लॅपटाॅप विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्याचाच फायदा आज भाजप घेत आहे. जिओचे नेटवर्क सर्वात चांगले लखनौमध्येच आहे, असा दावा त्यांनी केला. किसान, नौजवान, महिला, मागास, दलित, अल्पसंख्याक, व्यापारी यांच्यासाठी खूषखबर, दहा मार्च रोजी अखिलेश यादव येत आहेत, असा विश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला.

 Yogi Adityanath
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाला दिली 'वीर बाल दिना'ची भेट

राज्यात सात टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत असून त्यात प्रमुख सामना हा भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास त्याला केंद्रातील मोदी सरकारचा फायदा होणा असून हे `डबल इंजिन` राज्याचे हिताचे असल्याचे सांगत आहे. तर हे डबल इंजिन काही उपयोगाचे नसून 2022 मध्ये `सायकल`च येणार असल्याचे समाजवादी पक्ष म्हणत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in