अखिलेश यांनी पत्नीलाच घरी बसवलं; लोकसभेच्या निवडणुकीत चुलत भावाला झुकतं माप

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अखिलेश यांनी चुलत भाऊ व माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना संधी दिली आहे.
अखिलेश यांनी पत्नीलाच घरी बसवलं; लोकसभेच्या निवडणुकीत चुलत भावाला झुकतं माप
Dimple Yadav, Akhilesh Yadav Latest Marathi News Sarkarnama

लखनौ : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही पत्नी डिंपल यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी अखिलेश यांनी चुलत भाऊ व माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election Latest Marathi News)

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी विधानसभा निवडणुकीत विजयानंतर खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनुक्रमे आझमगड आणि रामपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याआधी डिंपल यादव यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले जाईल, अशी शक्यता होती. पण त्यांच्याजागी अखिलेश यांनी सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रील लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना उमेदवारी दिली. (Akhilesh Yadav denied ticket to his wife Dimple Yadav)

Dimple Yadav, Akhilesh Yadav Latest Marathi News
...तर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान मारणार! बच्चू कडूंनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

त्यानंतर आता लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याने अखिलेश हे डिंपल यांना आझमगढ किंवा रामपूर मतदारसंघात तिकीट देतील, असा अंदाज वर्तविली जात होता. पण इथेही अखिलेश यांनी राजकीय खेळी करत पक्षाचे बडे नेते आमदार आझम खान यांच्या पत्नी तंजीम फातिमा यांना रामपूर मतदारसंघातून उतरवलं आहे.

तर आझमगढ मतदारसंघात चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांना तिकीट दिलं आहे. धर्मेंद्र हे याआधी बदायू मतदारसंघाचे खासदार होते. पण 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या दोन्ही जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून 26 जून रोजी निकाल लागणार आहे.

आझमगड मतदरासंघातून भाजपने दिनेश लाल यादव ऊर्फ निरहूआ यांना उतरवलं आहे. तर बसपाने माजी आमदार शाह आलम उर्फ गुड्डू जमाली यांना तिकीट दिलं आहे. निरहुआ हे वर्ष 2019 मध्ये अखिलेश यादव यांच्याविरोधात लोकसभेला उभे होते. पण त्यांचा पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in