राज्यावर ओमिक्रॉनचे संकट आणि सोनिया गांधीचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी आज फोनवरून कोरोना आणि ओमिक्रॉन (Omicron) संकटाशी लढण्यासाठी सरकारच्या सर्व तयारीची माहिती घेतली.
Soniya Gandhi

Soniya Gandhi

Sarkarnama

रायपूर : देशावर सध्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरिअंटच संकट घोंघावत आहे. अशात प्रत्येक राज्य ओमिक्रॉनसह लढण्यासाठी पावलं उचलतं आहे. याच तयारीचा आढावा सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्यांकडून घेत आहेत. आज सोनिया गांधी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना फोन करुन राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन या संकटांशी लढण्यासाठी काय तयारी सुरु आहे? आणि काय झाली आहे? याचा आढावा घेतला.

स्वतः मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी आज फोनवरून कोरोना आणि ओमिक्रॉन (Omicron) संकटाशी लढण्यासाठी सरकारच्या सर्व तयारीची माहिती घेतली. रुग्णालयातील बेड, ऑक्सिजनची उपलब्धता याबद्दल सुसज्ज राहण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

<div class="paragraphs"><p>Soniya Gandhi</p></div>
जो न्याय मुंबईला, तोच नागपुरला का नाही? काँग्रेस नेत्याच्या पत्राने 'मविआ'त खळबळ

मुख्यमंत्री बघेल यांनी यावेळी सोनिया गांधींना राज्यातील सर्व आवश्यक व्यवस्थांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, छत्तीसगडमध्ये सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी, ओमिक्रॉनच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. तपासण्या सुरु आहेत. राज्याला ओमिक्रॉनच्या तपासण्यासाठी टेस्टिंग ओडिसामध्ये देण्यात आले आहे. पण आमची इतर तयारी पूर्ण झाल्याची ग्वाही मी त्यांना दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Soniya Gandhi</p></div>
CDS रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी पुर्ण; कशामुळे झाला अपघात?

छत्तीसगडमध्ये आतापर्यंत एकूण १० लाख ८ हजार ४६६ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९ लाख ९३ हजार ८४८ रुग्ण ठणठणीत होवून घरी गेले आहेत. तर १३ हजार ६०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात एकूण २७९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०१७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com