मोठी बातमी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक

काँग्रेस (Congress) नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे
मोठी बातमी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आईचे 27 ऑगस्ट रोजी इटलीमध्ये (Italy) निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट करून दिली आहे.

सोनिया गांधी यांच्या आईचे नाव पाऊलो मायनो असे होते. त्यांचे निधन झाल्यानंतर गांधी परिवाराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, जयराम रमेश यांनी ट्विटकरून आज ही माहिती दिली. पाओला माईनो यांचे निधन २७ ऑगस्टला झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

मोठी बातमी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक
आप नेत्यांच्या अडचणीत वाढ; उपराज्यपाल सक्सेना करणार कायदेशीर कारवाई

इटलीमध्ये सोनिया गांधी यांचे कुटुंब राहते. जयराम रमेश आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की ''श्रीमती सोनिया गांधी यांच्या आई श्रीमती पाऊलो मायनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले.

मंगळवारी दफनविधी करण्यात आले. सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणासीठी राहुल गांधी, प्रियांका गांधी हे देखील ब्रिटनला गेले होते. ब्रिटनमधील वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर सोनिया गांधी त्यांच्या आई भेटायला जाणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली होती. पाऊलो मायनो अनेक दिवसांपासून आजारी होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in