Rajasthan Politics : शक्तीप्रर्दशन गेहलोतांना भोवलं : अध्यक्षपदाची संधी हुकली; मुख्यमंत्री पदही जाणार?

Rajasthan Politics : आतापर्यंत काँग्रेसच्या (congress) अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव आघाडीवर होते.
Ashok Gehlot
Ashok GehlotSarkarnama

Rajasthan Politics : नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आज काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आतापर्यंत या पदासाठी गेहलोत यांचे नाव आघाडीवर होते. दोन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये जे काही घडले त्याबद्दल मी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची माफी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

मी राजस्थानचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी माझ्या नैतिकतेच्या आधारे माफी मागितली आहे. मात्र, राजस्थानमध्ये जे काही घडले त्यात माझा हात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज (ता. 29) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मी एक ओळीचा प्रस्ताव मंजूर करू शकलो नाही, हे माझे अपयश आहे. राजस्थानमधील घटनेबद्दल मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे.

Ashok Gehlot
ShivSena : शिवतारे, आढळराव अ्न सोनवणेंवर उद्धव ठाकरेंची मात; मोठा नेता शिवसेनेत सक्रीय

मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार

मी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय सोनिया गांधी घेतील, असे गेहलोत यांनी सांगितले. गेहलोत म्हणाले, राजस्थानमध्ये दोन दिवसांपूर्वी जे काही घडले त्यामुळे मी हादरलो आहे. गेल्या 50 वर्षांत राजीवजींपासून ते सोनिया गांधींपर्यंत मी एक निष्ठावान सैनिक म्हणून काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Ashok Gehlot
भाजप नेत्याच्या ट्विटमुळे दसरा मेळाव्याआधीच शिंदे गट अडचणीत...

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावर गेहलोत राहणार की नाही, याचा निर्णय सोनिया गांधी दोन दिवसात घेणार आहेत, असे के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. आमदारांनी केलेले बंड गेहलोत यांना भोवणार का? अशा प्रश्न निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला उपस्थित न राहता गेहलोत गटाच्या आमदारांनी वेगळी बैठक घेतली होती.

त्यामुळे गेहलोत यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा अहवाल, अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्या बैठकीचा अहवाल सोनिया गांधी यांना दिला होता. त्यानंतर गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in