कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील व्यवस्था नव्हे तर मोदी सरकार अपयशी ठरलंय!

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत.
Sonia Gandhi slam Modi government over covid second wave management
Sonia Gandhi slam Modi government over covid second wave management

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशात रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडली असून, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. याची गंभीर दखल घेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कान टोचले आहेत. देशातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Sonia Gandhi slam Modi government over covid second wave management) 

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधींनी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधला.  त्या म्हणाल्या की, कोरोना महामारीत देशातील व्यवस्था नव्हे तर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलावण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारी ही सर्व राजकीय मतभेदांपलिकडील आहे. सर्वांनी ती मिळून लढायला हवी. जनतेच्या जिवाशी काहीही देणेघेणे नसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय नेतृत्वाखाली भारताची वाताहत सुरू आहे. 

मोदी सरकारची अकार्यक्षमता आणि भेदभावाच्या वागणुकीमुले देश बुडू लागला आहे. आता आपण सर्वांनी पोलादी बनून देशाच्या सेवेसाठी पुन्हा समर्पित व्हायला हवे. मोदी सरकारला देशातील अनेक शक्ती आणि स्त्रोतांचा वापर करुन घेता आलेला नाही. देशातील जनतेची मोदी सरकारने निराशा केली आहे. हे सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला सोनिया गांधींनी लगावला. 

निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी निराशाजनक 
या बैठकीला राहुल गांधी, माजी  पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस सदस्य उपस्थित होते. देशात नुकत्याच झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशानजक असल्याची कबुलीही सोनिया गांधींनी दिली. काँग्रेसच्या प्रत्येक खासदाराने यातून धडा घ्यायला हवा. त्यांनी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे जनतेची सेवा करायला हवी, असे त्यांनी सांगितले. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com