सोनिया गांधी अँक्शन मोडमध्ये ; पराभवानंतर पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना डच्चू

राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updatessarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तरांखड, मणिपूर, गोवा या पाच राज्यातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉग्रेस पार्टी आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. कॉग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi)यांनी या पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे.

कॉग्रेसचे नेता रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांनी उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तरांखड, मणिपूर, गोवा या पाच राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांच्याजागेवर नवीन नियुक्ती होणार आहे, असे सुरजेवाला यांनी आपल्या टि्वटमध्ये सांगितले आहे. (Sonia Gandhi News Updates)

Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींचा व्हिडिओ व्हायरल ; फडणवीसजी, उत्तर द्याल का?

पंजाबमध्ये नवज्योत सिद्धू, उत्तरप्रदेशमध्ये अजय कुमार लल्लू, उत्तराखंडमध्ये गणेश गोदियाल, गोवा गिरीश चोडनकर, मणिपुरमध्ये नमेईरकपैम लोकन सिंह हे प्रदेशाध्यक्ष आहेत, या सर्वांना सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्यास सांगितले आहे.

''राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या,'' असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. कॉग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी झाली. या बैठकीत पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यात आले.

Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींचा व्हिडिओ व्हायरल ; फडणवीसजी, उत्तर द्याल का?

पाच राज्यात पराभव झाल्यामुळे गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची चर्चा दोन दिवसापासून सोशल मीडियावर सुरु आहे. याबाबत काँग्रेस (congress)पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi)यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

''पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत,'' असे सोनिया गांधी म्हणाल्या. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे. ''काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हाला सर्वांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे,'' असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. चिंतन शिबिरात पराभवावर चर्चा झाल्यावरच याबाबत निर्णय होणार असल्याचे पक्षाकडून ठरविण्यात आले.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ''काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे नेतृत्व करतील आणि भविष्यातही असाच निर्णय घेतील. आपल्या सर्वांचा त्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे,'' सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सीडब्ल्यूसीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर एकमताने विश्वास व्यक्त केला आहे.

बैठकीत सर्व नेत्यांचे म्हणणे सोनिया गांधी यांनी ऐकून घेतले. त्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील रणनीती आखली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पक्षाच्या मुख्यालयात चार तासांहून अधिक काळ ही बैठक चालली. सोनिया गांधी, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आदी उपस्थित होते. जी२३ गटाचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक यांनीही सहभाग घेतला. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित नव्हते. कोविड १९ ची लागण झाल्यामुळे ज्येष्ठ नेते ए के अँटनी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com