तमिळनाडूत रणकंदन; अण्णाद्रमुकच्या नेतृत्वावरून दोन माजी मुख्यमंत्र्यांचे समर्थक भिडले

जयललिता यांच्यानंतर पक्षात नेतृत्वावरून जोरदार रस्सीखेच.
AIADMK Latest Marathi News
AIADMK Latest Marathi NewsSarkarnama

चेन्नई : तमिळनाडूतमध्ये अण्णाद्रमुकच्या नेतृत्वारून पक्षीय राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे दिवंगत जयललिता यांचा अण्णाद्रमुक हा पक्षही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. सोमवारी सकाळी दोन माजी मुख्यमंत्र्यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. माजी मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी पक्षावर एकहाती ताबा मिळवला आहे. (AIADMK Latest Marathi News)

तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) नेतृत्वाच्या मुद्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते व दोन माजी मुख्यमंत्री आमनेसामने उभे ठाकले आहेत. ओ. पनीरसेल्वम आणि एडापडी पलानीस्वामी यांच्यामध्ये नेतृत्वासाठी लढाई सुरू आहे. पक्षाची सर्वसाधारण सभा सोमवारी सुरू आहे. ही सभा रद्द करावी अशी मागणी पनीरसेल्वम यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळल्यानंतर सभेचा मार्ग मोकळा झाला.

AIADMK Latest Marathi News
Eknath Shinde News : नरहरी झिरवाळांच्या उत्तरानं शिंदे सरकार अडचणीत येणार?

सर्वसाधारण सभेमध्ये पलानीस्वामी यांची अंतरिम महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच दोन नेतृत्वाऐवजी एकाच नेतृत्वाला मान्यता देणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्याआधी पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. सभेच्या ठिकाणी तसेच पक्ष कार्यालयाबाहेर समर्थक एकमेकांना भिडले.

जाळपोळ, खुर्च्यांची मोडतोड, पोस्टर फाडणे, हाणामारी अशा घटना घडल्या आहेत. पनीरसेल्वम यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाच्या दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. पनीरसेल्वम यांना आता पक्षाने बाजूला सारल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे समर्थकांकडून पलानीस्वामी यांचा जोरदार विरोध केला जात आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर 2017 पासून या दोन्ही नेत्यांकडे पक्षाचे नेतृत्व आहे. पण आता केवळ एकच नेता पक्षाचे नेतृत्व करू शकतो, या मागणीने जोर धरला होता.. यातून दोन्ही नेत्यांकडून आपणच जयललिता यांचे खरे वारसदार असल्याचा दावा केला जात आहे. पण आता पक्षच्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in