तुषार मेहतांनी नाकारली विरोधी पक्षनेत्यांना भेट अन् सत्ताधारी पक्षाचं थेट मोदींना पत्र - Soliciter General Tushar Mehata denied meeting with Suvendu Adhikari | Politics Marathi News - Sarkarnama

तुषार मेहतांनी नाकारली विरोधी पक्षनेत्यांना भेट अन् सत्ताधारी पक्षाचं थेट मोदींना पत्र

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

सॅालिसिटर जनरल हे देशातील अॅटर्नी जनरल यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आहेत.

नवी दिल्ली : सॅालिसिटर जनरल तुषार मेहता यांना भेटण्यासाठी गेलेले पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी गेल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. दोघांची भेट झाल्याचा दावा करत तृणमूल काँग्रेसनं थेट मेहता यांना पदावरून हटवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडं केली आहे. (Soliciter General Tushar Mehata denied meeting with Suvendu Adhikari)

सुवेंदू अधिकारी मेहता यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. अधिकारी हे नारदा व शारदा चीट फंड घोटाळ्यातील आरोपी आहेत. सॅालिसिटर जनरल हे देशातील अॅटर्नी जनरल यांच्यानंतर या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आहेत. गंभीर आरोप असलेल्या आरोपींची अशी भेट घेणं अयोग्य असल्याचं तृणमूलने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा : अधिकारी दाद देत नसल्यानं समाज कल्याण मत्र्यांची थेट राजीनाम्याची घोषणा

या भेटीमुळे लोकांच्या मनामध्ये मेहता यांच्याविषयी संशय निर्माण झाला आहे. त्यामुळं या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना पदावरून हटवावं, अशी मागणी तृणमुलचे खासदार डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रॅाय आणि महूआ मोईत्रा यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. या पत्रावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. 

मेहता यांनी मात्र आपण अधिकारी यांची भेट घेतली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, अधिकारी काल माझ्या घरी भेटण्यासाठी आले होते. पण माझी नियोजित बैठक सुरू होती. माझ्याकडील कर्मचाऱ्यांनी अधिकारी यांना थांबण्यास सांगितले. माझी बैठक संपल्यानंतर कमर्चाऱ्यांनी अधिकारी यांना मी भेटण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगितले. ते मला भेटण्यासाठी आग्रह न करता निघून गेले. त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मेहता यांनी सांगितलं. 

विधानसभेत गदारोळ

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून सुरू झालेल्या या गोंधळात राज्यपाल जगदीप धनखर यांनी अभिभाषण सुरू केलं. पण या गोंधळामुळं पाच मिनिटांतच त्यांना भाषण थांबवावं लागलं. भाषण न करताच ते निघून गेल्याने विधीमंडळाचे कामकाज काही काळासाठी थांबवावं लागलं. तसेच भाजपच्या आमदारांनीही वॅाकआऊट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख