..तर संसदीय इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल; धनखडांचा अर्ज दाखल

Vice-President Election : धनखड यांचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भाजपने एनडीएच्या शक्तीप्रदर्शनाची संधी पुन्हा साधली.
Jagdeep Dhankar & OM Birla Latest News
Jagdeep Dhankar & OM Birla Latest News Sarkarnama

Vice-President Election : उपराष्ट्रपती पदासाठी भाजप (BJP) प्रणित एनडीएचे (NDA) उम्मीदवार जगदीप धनख़ड (Jagdeep Dhankar) यांनी आज (ता. 18 जुलै) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संसदेतील संख्याबळ पहाता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक असून अपेक्षेनुसार धनखड विजयी झाल्यास 11 ऑगस्ट रोजी राज्यसभेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतील. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही संसदीय सभागृहांचे पीठासीन अधिकारी राजस्थानातील असण्याची संसदीय इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) कोटातून तर धनखड झुन्झुनू जिल्हयातील आहेत. (Jagdeep Dhankar & OM Birla Latest News)

Jagdeep Dhankar & OM Birla Latest News
Presidential Election 2022 : मुर्मू -सिन्हा यांच्यात लढत, आज मतदान

धनखड यांचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भाजपने एनडीएच्या शक्तीप्रदर्शनाची संधी पुन्हा साधली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री रामदास आठवले, वीरेंद्रकुमार वैश्य, अनुप्रिया पटेल, यांच्यासह संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती, बीजू जनता दल, रिपब्लिकन पक्ष (आठवले) व एनडीए घटकपक्षांचे नेते यानिमित्ताने लोकसभा सचिवालयात उपस्थित होते. मोदी यांनी धनखड यांच्या उमेदवारी अर्जावर पहिले प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास संसदीय ग्रंथालयात एनडीए पक्षनेत्यांचीही बैठक पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली. तीत मोदी यांनी धनखड यांच्यामागे सारे बळ उभे करण्याचे पुन्हा आवाहन केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दनखड व मावळते उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याशी 'चाय पे चर्चा' केली. त्यानंतर धनखड यांनीही विविध पक्षीय खासदारांबरोबर संवाद साधला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, देशाच्या लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी मी कटिबद्ध असेन. मला या वरिष्ठ घटनात्मक पदाची संधी मिळेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधानांचे संसदेत आगमन झाल्यावर धनखड आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले.

Jagdeep Dhankar & OM Birla Latest News
Presidential Election : डॉ. मनमोहनसिंगांनी व्हीलचेअरवरून येत बजावले मतदानाचे कर्तव्य!

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. अल्वा यांचा सर्वपक्षीय संपर्क आजही उत्तम आहे. मात्र संसदीय मतांच्या गणितात भाजपचे वर्चस्व ठळकपणे दिसते. लोकसभेतील 543 व राज्यसभेतील 233 अशा 876 खासदारांपैकी एकट्या भाजपकडे 303 व 91 मिळून तब्बल 394 खासदारांचे बळ असून यात राष्ट्रपतीनियुक्त 5 खासदारांची भर पडणार आहे. म्हणजे भाजपची हक्काची मते असतील 399. भाजपच्या मतांमध्ये एनडीएची मते समाविष्ट केली की तिथेच धनखड यांचा स्पष्ट विजय दृष्टीपथात आल्याचे जाणवते. याशिवाय बीजू जनता दल, अण्णाद्रमुक, अकाली दल, बसपा, तेलगू देसम, वायएसआर कॅाग्रेस आदी एनडीएच्या बाहेरील पक्षांची मतेही धनखड यांना मिळणार आहेत.

राजकीय समीकरणे

धनखड यांच्यासारख्या जाट नेत्याला बळ देऊन त्या निमित्ताने कॅाग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेणे या ठळक उद्देशातून भाजप नेतृत्वाने धनखड यांना उपराष्ट्रपती बनविण्य़ाचा निर्णय घेतला. त्यांच्या उमेदवारीने राजस्थान कॅाग्रेसमुक्त व राजस्थान भाजप वसुंधराराजे मुक्त करण्याचे भाजप नेतृत्वाचे उद्दिष्ट आहे. या राज्यात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. या परिस्थीतीत सर्वोच्च चारपैकी दोन पदांवर भाजपने राजस्थानच्या नेत्यांना संधी दिल्याचा जोरदार प्रचार भाजपच्या वतीने करण्यात येणार हेही स्पष्ट आहे. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे मागासवर्गीय तर सचिन पायलट गुर्जर समाजातून येतात. त्यामुळे जाट, राजपूत व मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीयांचे जातीय समीकरण साधून राजस्थानात सत्तावापसीचे भाजपचे ध्येय आहे.

Jagdeep Dhankar & OM Birla Latest News
राष्ट्रपती निवडणुकीतही वादाची ठिणगी; नितीन राऊतांना भाजपचे लोणीकर आणणार अडचणीत

दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून ममता बॅनर्जी यांच्या सराकारशी रोजच्या रोज पंगा घेणारे धनखड यांची दिल्लीत बदली केल्याने तृणणूल कॅाग्रसमध्ये दिलासा व सुटका अशा मिश्रणाचे वारे वहात असल्याचे त्या पक्षाच्या खासदारांनीही मान्य केले. धनखड यांनी बंगालमध्ये राज्यपाल म्हणून नव्हे तर भाजपचे प्रवक्ते म्हणून काम केले. त्यांना त्याची बक्षिशी किंवा इनाम भाजपकडून मिळाले. आता राज्यसभेच्या सदस्यांची परीक्षा आहे, अशा उपरोधिक शब्दांत ज्येष्ठ तृणमूल नेते सौगत रॅाय यांनी आपली भावना मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com