Narendra Modi : ''...तर २०२३ च्या मध्यातच मोदींना पंतप्रधानपद सोडावं लागेल!''; भाजप नेत्याच्या टि्वटनं खळबळ

Bjp News : पंढरपूर कॉरिडोरवरुनही भाजपला घरचा आहेर..
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

Subramanian Swamy On Narendra Modi : भाजपनं लोकसभेच्या २०२४ च्या निव़डणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. मिशन १४४ ची घोषणा करतानाच भाजपनं आपल्या केंद्रीय मंत्र्यांना कामाला लावले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनीही २०२४ ला मोदीच पंतप्रधान असणार अशी घोषणाही केली आहे. पण याचवेळी भाजप नेत्यानं केलेल्या टि्वटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

माजी खासदार व भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. कधी ते विरोधकांना खडेबोल सुनावताना दिसतात तर कधी ते पक्षालाच घरचा आहेर देतात. मध्यंतरी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून पंढरपूर कॉरिडोरची घोषणा करण्यात आली होती.कॉरिडोरला सुब्रमण्यम स्वामी(Subramanian Swamy) यांनी विरोध केल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता पुन्हा एकदा स्वामी त्यांच्या टि्वटमुळे चर्चेत आले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी टि्वटद्वारे अजित डोवाल(Ajit Dowal) यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरुन दूर करण्याची मागणी केली आहे. याचसोबत एक मोठं विधान करण्यात आलं आहे. जर डोवाल यांना पदावरुन दूर केलं नाही तर मोदींना 2023 च्या मध्यात पंतप्रधानपद सोडावं लागू शकतं असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वामी यांनी टि्वटद्वारे डोवाल यांच्यावर गंभीर आऱोप केले आहे. पेगासस टेलिफोन टॅपिंगसारखी चूक डोवाल यांनी अनेकदा केली आहे असं स्वामी म्हणाले.

Narendra Modi
Chinchwad : उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने 'आप'ने केला एक पदाधिकारी निलंबित; तर दुसऱ्यालाही दिली नोटीस

...पण भाजपचे पावित्र्य अबाधित राहावे!

अमेरिकन स्थित हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या एका रिपोर्टनं अदानी समूहाच्या यशाला ब्रेक लावला. अवघ्या काही तासांत गौतम अदानी वैयक्तिक पातळीवर जगातील श्रीमंतांच्या यादीत टॉप २० मधून बाहेर पडले आहेत. याशिवाय अदानी समूहाचे मार्केट कॅपमध्येही ११७ अब्जापेक्षा अधिक घट झाली आहे. यामुळे गौतम अदानी(Gautam Adani) यांची संपत्ती निम्म्यावर आली आहे.

याच पार्श्वभूमीवरच स्वामी यांना अदानींसोबत काँग्रेसनं कधी करार केले नाहीत का? या प्रश्नावर स्वामी म्हणाले, मी त्यांच्यापैकी अनेकांना ओळखतो, ज्यांचे अदानींसोबत अनेक व्यवहार आहेत, पण मला काँग्रेसची पर्वा नाही. पण भाजपचे पावित्र्य अबाधित राहावेअशी माझी इच्छा असल्याचंही स्वामी यांनी यावेळी सांगितले.

Narendra Modi
Pune : शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज; राज्य सरकार निर्णय कधी घेणार ?

''पंढरपूर कॉरिडोरवरुन पक्षालाच घरचा आहेर..''

पंढरपूर कॉरिडोरला सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला होता. यावेळी त्यांनी मंदिरे ताब्यात घेण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही‌. मंदिरे चालवणे हे सरकारचे काम नाही. मंदिरेच काय इतर कोणतेही प्रार्थनास्थळ सरकारला ताब्यात घेता येत नाही.

बाकीच्या कोणत्याही प्रार्थनास्थळाला सरकारने हात लावलेला नाही मग हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणाखाली का? या अगोदरही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा सरकारी नियंत्रणातून मुक्त करू आणि जबरदस्तीचा कॉरिडोर होऊ देणार नाही. नागरिकांची घरे व संतांच्या धर्मशाळा वाचवू अशी ग्वाही स्वामी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com