...म्हणून केजरीवालांनी मानले गुजरातचे आभार !

गेल्या 75 वर्षांपासून शिव्यांचं राजकारण, मारहाणीचं राजकारण, जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, हे सगळं या देशात सुरू होतं.
CM Arvind Kejariwal
CM Arvind Kejariwal

Gujarat Election Result 2022 : ''मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. दहा वर्षांपूर्वी आम आदमी पार्टी हा एक छोटा पक्ष होता. केवळ 10 वर्षे अस्तित्वात असलेल्या तरुण पक्षाचे दोन राज्यात सरकार आहे. पण आज तो राष्ट्रीय पक्ष बनला आहे. ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे. मी विशेषतः गुजरातच्या जनतेचे आभार मानू इच्छितो. मी जेव्हा जेव्हा गुजरातमध्ये आलो तेव्हा मला तुमच्या लोकांकडून खूप प्रेम, आदर आणि विश्वास मिळाला, ज्यासाठी मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन,'' अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या सर्वेसर्वा नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (आप) गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत सपाटून मार खाल्ला असला तरी निकालांच्याच दिवशी या पक्षाला एक अनोखी ‘भेट' मिळाली आहे. ती म्हणजे आता आप हा देशातील आठवा ‘राष्ट्रीय मान्यतेचा‘ पक्ष बनला आहे. हार होऊनही आप'ला राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने केजरीवाल यांनी गुजरात जनतेचे आभार मानले आहेत.

CM Arvind Kejariwal
Arvind Kejriwal News : केजरीवालांचा डबल धमाका; गुजरातमध्ये हारुनही जिंकले

''मला गुजरातच्या लोकांकडून खूप काही शिकायला मिळाले. गुजरात हा एकप्रकारे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, तो आपल्याकडे भेदण्यात यशस्वी झाला. आज गुजरातमध्ये आम्हाला जवळपास 13% मते मिळाली आहेत. आतापर्यंत जवळपास ३९ लाख मते मिळाली आहेत. त्यामुळे अनेकांनी आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदाच आम्हाला मतदान केले. मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.

केजरीवाल म्हणाले, गुजरातच्या जनतेच्या आशीर्वादाने पुढच्या वेळीही गड जिंकू. आम आदमी पक्षाने संपूर्ण प्रचार सकारात्मक पद्धतीने केला. कोणी शिवीगाळ केली नाही. कोणावरही अपशब्द वापरले नाहीत. आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये इतके काम केले आहे. गुजरातमध्ये संधी मिळाल्यास आम्ही या सर्व गोष्टी करू. हेच आप'ने प्रचारादरम्यान सांगितलं. आम आदमी पक्षाने फक्त आपल्या कामावर चर्चा केली. हाच आमचा वेगळेपणा आहे. असही केजरीवाल यांनी सांगितलं.

गेल्या 75 वर्षांपासून शिव्यांचं राजकारण, मारहाणीचं राजकारण, जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, हे सगळं या देशात सुरू होतं. देशाच्या प्रश्नांवर आणि जनतेच्या प्रश्नांवर बोलणारा पक्ष पहिल्यांदाच आला आहे. देशाला नंबर वन बनवण्याची चर्चा आहे. देशाला पुढे नेण्यासाठी शाळा बांधण्याबाबत बोलतो. हॉस्पिटलमध्ये वीज रस्ता दुरूस्तीची चर्चा आहे. आम आदमी पार्टी दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांवर बोलतो. अशा भावनाही यावेळी केजरीवाल यांनी व्यक्त केल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com