तर.. भारतही कराची आणि लाहोरविना पूर्ण होऊ शकत नाही

नरेंद्र मोदी यांनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी दिली
Indresh Kumar
Indresh Kumar

नवी दिल्ली : "जर जम्मू-काश्मीरशिवाय (Jammu-Kashmir) पाकिस्तान (Pakistan) अपूर्ण आहे. तर, कराची (Karachi) आणि लाहोरविनाही (Lahore) भारत (India) अपूर्ण आहे," असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणावर टीका करत आसूड ओढला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू- काश्मीरच्या मुद्द्यावरुन होणारे वाद संपूर्ण जगाला माहित आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचा दावा केला आहे. याच मुद्द्यावरून आता उत्तर दिले आहे. भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, आणि भारतातील दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यावर भर द्याला, असा सल्लाही इंद्रेश कुमार यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले असल्याचेही इंद्रेश कुमार यांनी यावेळी नमूद केले.

Indresh Kumar
`फडणविसांच ऐकलं आणि नारायण राणेंच पुण्याला येणं थांबलं`

दरम्यान, यापूर्वी वाराणसी येथे बोलताना, इंद्रेश कुमार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद ओढावला होता. "ज्या लोकांना मोहम्मद अली जिना महापुरुष वाटतात, त्यांनी तातडीने भारत सोडावा. भारत आणि भारतीयांवर ओझे होऊन उगाचच येथे राहू नये,' अशी घणाघाती टीकाही इंद्रेश कुमार यांनी केली होती. तसेच, दुसऱ्यांना चुकीचे ठरवण्यासाठी त्यांच्यावर निराधार आरोप करणे किंवा दावे करणे चुकीचे असल्याचंही इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते.

तर प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले की, भाजपचा एक कार्यकर्ता असल्याने आम्हाला अभिमान आहे की आम्ही दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करू शकलो आहोत, कारण एक काळ असा होता की सरकारे खूप आश्वासने देत असत. पण त्या आश्वासनांची ग्राउंड रिअॅलिटी मोजकीच होती, जास्त होती, पण आज समाजाचा आणि देशाचा दृष्टिकोन बदलला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com