New Parliament Building Inauguration
New Parliament Building InaugurationSarkarnama

New Parliament Building : ''संसद भवन भाजप-संघाचं कार्यालय नाही, मी... !''; माजी पंतप्रधानांनी ठणकावलं

New Parliament Building Inauguration : मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नवीन संसद भवनाचं उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

New Parliament Building : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी नवीन संसद इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी आग्रही मागणी धरत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन विरोधक एकवटले असतानाच माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच डी देवेगौडा यांनी मात्र मोठं कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांनाही टोला लगावला आहे.

मोदी सरकार(Modi Government)चा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नवीन संसद भवनाचं उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांच्या बहिष्काराचं सावट असणार आहे. काँग्रेससह 20 राजकीय पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर देवेगौडांनी सोहळ्याला जाणार असल्याचा घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

New Parliament Building Inauguration
Pune Loksabha By Election 2023: पुणे लोकसभेसाठी कोण असेल काँग्रेसचा उमेदवार: 'या' नावांची आहे चर्चा?

जेडीएसचे प्रमुख एच डी देवेगौडा (H D Deve Gowda) यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. देवेगौडा म्हणाले, "संसद भवन हे काही भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय नाही. लोकांच्या पैशानं उभारलेलं संसद भवन आहे. त्यामुळे मी उद्घाटन सोहळ्याला जाणार आहे असं देवेगौडा म्हणाले. मात्र, यासोहळ्याला संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये काँग्रेस, टीएसी,डीएमके, जेडीयू, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), माकप, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल या बड्या पक्षांचा समावेश आहे.

विरोधकांनी संसद भवनाच्या उद्घाटन (New Parliament Building Inauguration) सोहळ्याला बहिष्कार टाकला असतानाच आता विरोधी पक्षांपैकी केवळ देवेगौडाच नाही तर आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंची तेलुगू देशम पार्टी (TDP), ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दल (BJD),शिरोमणी अकाली दल, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची बहुजन समाज पार्टी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांचा वाएसआर काँग्रेस पक्ष (YSRCP) आणि लोक जनशक्ति पार्टी (पासवान) हे उपस्थित असणार आहेत.

New Parliament Building Inauguration
New Parliament Building Inauguration: '28 मे' तारीख उद्घाटनासाठी निवडण्यामागे आहे 'खास' कारण ?

मोदी सरकारची जय्यत तयारी...

केंद्रातील मोदी सरकारकडून नवीन संसद भवनाच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमांची सुरुवात अगदी सकाळी ७.३० वाजल्यापासून होणार आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. हा सोहळा किती वेळ सुरू राहील, कधी कोणत्या गोष्टी सुरू होतील, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला सकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत हवन व पूजेचं आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच तामिळनाडूमधील मठाधिपतींच्या उपस्थितीत लोकसभेत विधिवत सेंगोलची स्थापना केली जाणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com