Karnataka Election News: '' ...म्हणून काँग्रेसनं कर्नाटकमधील विजयानंतर जास्त खूश होऊ नये !''; प्रशांत किशोरांचं मोठं विधान

Prashant Kishor News : कर्नाटकमधील विजय हा काँग्रेस पक्षासाठी संजीवनी ठरणार असल्याचा दावा नेते करत आहे.
Karnataka Election News,Prashant Kishor News
Karnataka Election News,Prashant Kishor News Sarkarnama

Prashant Kishor News : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेसनं बहुमताला जादुई आकडा गाठत भाजपवर दणदणीत विजय मिळवला. यावेळी काँग्रेस पक्षानं तब्बल १३५ जागा मिळवल्या तर भाजपला अवघ्या ६६ जागांवर समाधान मानावं लागलं. एकापाठोपाठ पराभवाचे धक्के खाल्ल्यानंतर कर्नाटकमधील हा विजय काँग्रेस पक्षासाठी संजीवनी ठरणार असल्याचा दावा नेते करत आहे.याचमुळे देशभरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला जात आहे. पण आता कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये असं विधान राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या कर्नाटकामधील विजयावर भाष्य केलं आहे. तसेच काँग्रेसला महत्वाचा सल्ला दिला आहे. किशोर यांनी समस्तीपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किशोर म्हणाले, कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये, कारण 2013 मध्येही कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा पराभव झाला होता.

Karnataka Election News,Prashant Kishor News
Dk Shivkumar : माझ्यासह १३५ आमदार सोनिया गांधींना समर्पित : डी. के. शिवकुमारांची भावना; मुख्यमंत्रिपदाचा विषय हायकमांडवर सोपवला

प्रशांत किशोर यांना दुखापतीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोर म्हणाले, मला दुखापत झाल्यामुळे बिहारमधील त्यांच्या 'जन सूरज' पदयात्रेपासून जवळपास महिनाभर दूर राहावं लागणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला सुरू झालेली पदयात्रा आता सुमारे 15 दिवस स्थगित करावी लागत आहे. पण यानंतर नव्या जोमानं ही पदयात्रा पुन्हा सुरू होऊ शकते. प्रकृती अस्वास्थामुळे या यात्रेना काही दिवस मुकावे लागणार असल्याची माहितीही किशोर यांनी यावेळी दिली आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा पेच

बहुमताचा आकडा गाठत सत्तेत आलेल्या काँग्रेस(Congress)मध्ये आता मुख्मंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे.एकीकडे सिद्धरामय्या यांचे पारडे जड मानले जात आहे. पण दुसरीकडे डीके शिवकुमार हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावा सांगत आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

Karnataka Election News,Prashant Kishor News
Shahaji Patil New: सांगोल्यात पुन्हा लाल दिव्याची चर्चा : आमदार शहाजीबापू म्हणतात ‘संधीचे सोने करेन...

अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली तर डीके शिवकुमार पक्षाकडे याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची मागणी करु शकतात. पण पक्षातील काही सुत्रांच्या माहितीनुसार, डीके शिवकुमार(DK Shivkumar), उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडाळात काही महत्त्वाची खाती मागू शकतात. याशिवाय ते आपल्या लोकांना मंत्रिमंडळात सर्वाधिक जागा देण्याचीही मागणी करु शकतात.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com