स्मृती इराणी अडचणीत येणार; मुलीचे 'ते' प्रकरण आले समोर

Trinmool Congress|BJP| माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यावरील कारवाई नंतर आता तृणमुल कॉंग्रेसने स्मृती इराणी यांच्या मुलीचे एक प्रकरण बाहेर काढले आहे.
Trinmool Congress|BJP|
Trinmool Congress|BJP|

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्यात झालेली अटक व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्यात घेरण्याची त्याच ईडीकडून (ED) पूर्ण तयारी होणे, या घटनाक्रमातच विरोधकांनी आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचे गोवा येथील रेस्टॉरंट व बार पूर्णपणे अवैध असल्याचे प्रकरण बाहेर काढले आहे. इराणी यांनी याचा इन्कार केला तरी यावरून भाजप व विरोधकांमध्ये पुन्हा जोरदार जुंपणार असून त्याचे पडसाद संसदेच्या अधिवेशनावरही पडणे अपरिहार्य आहे. एकूणच हे अधिवेशन शब्दशः ‘पावसाळी‘ ठरणार अशी चिन्हे आहेत. पहिल्या आठवड्यात संसदेचे बहुतांश कामकाज गोंधळामुळे ठप्प पडले होते व दुसऱ्या आठवड्यात फार काही वेगळे घडण्याची शक्यता दिसत नाही.

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ED ने शुक्रवारी रात्री टीएमसी पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटची मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर काल छापेमारी करून किमान २० कोटींहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचे म्हटले आहे. भाजपने ‘हे तर फक्त ट्रेलर आहे,‘ असे सांगून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. पश्चिम बंगालचे वादग्रस्त राज्यपाल जगदीप धनखड यांची दिल्लीत ‘बदली‘ केल्यावर ममता बॅनर्जी यांना सुटकेचा निश्वास घेता येईल अशी अटकळही भाजप नेतृत्वाने चॅटर्जींची धरपकड करून खोटी ठरविली आहे.

Trinmool Congress|BJP|
मुलगा विहानचा स्ट्रॉबेरीचा हट्ट अन्‌ माझी साताऱ्याला बदलीचा योगायोग.....

इकडे दिल्लीतही भाजप नेतृत्वाने आम दमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा उजवा हात असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या डोक्यावर अबकारी शुल्क प्रकरणात अटकेची तलवार टांगली आहे. सिसोदिया यांना भाजप नेतृत्वाच्या मनात येईल त्या क्षणी जेलमध्ये जावे लागेल अशी स्थिती आहे. भाजपने आजही केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. सिसोदिया यांच्याविरूध्दचे प्रकरण दिल्लीत सवलतीतील दारूचा पूर आल्याचे असल्याने भाजपची संस्कृतीरक्षक ब्रिगेड विशेष उत्साहात आहे. सिसोदिया यांच्या विभागातील हा अबकारी घोटाळा प्रचंड मोठा व गंभीर असल्याने आता धरणे धरण्याची नव्हे तर प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी व अन्य भाजप नेत्यांनी दिली आहे. आपचे संख्याबळ अलीकडे वाढल्याने संजय सिंह, राघव चढ्ढा आदी खासदार राज्यसभा दणाणून सोडणार हेही उघड आहे.

याच दरम्यान विरोधकांच्या हातीही टीम मोदीमधील एका ‘प्रभावशाली‘ मंत्र्यांशी संबंधित कथित घोटाळ्याचे प्रकरण हाती लागले असून या मंत्र्यांचे नाव स्मृती इराणी आहे ! इराणी यांच्या मुलीच्या गोवा येथील बारचा परवानाच बनावट व खोटा आहे. असा बोगस परवाना केवळ इराणी यांची मुलगी असल्यानेच दिला गेला का याचा तपास करण्याची कॉंग्रेसने मागणी केली आहे. या प्रकरणी गोव्यातील बारला नोटीस पाठविणाऱया आयकर अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याच्या हालचाली असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसने केला आहे. हे प्रकरण बाहेर काढणारी आरटीआय कार्यकर्ती रॉड्रिग्ज हिच्या जिवाला भाजपच्या प्रमोद सावंत सरकारकडून धोका असल्याची भिती कॉंग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी केली.

भाजप केवळ आरोप करते व आम्ही कागदपत्रांसह बोलत आहोत. गोव्यातील बोगस परवाना घेऊन काढलेला हा बार स्मृती इराणी यांच्या मुलीचा आहे. पंतप्रधानांनी इराणी यांचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे असी मागणी रमेश यांनी कली. हे प्रकरण आम्ही संसदेतही उपस्थित करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान इराणी यांनी आपल्या मुलीवरील आरोप फेटाळले आहेत. गोव्यात ज्या बारबद्दल कॉंग्रेस आरोप करत आहे त्याच्याशी पल्या मुलीचा कागदोपत्री काहीही संबंध नाही असाही दावा इराणी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in