Smriti Irani :भाजप नेत्याची बदनामी ; कॉंग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना समन्स

जयराम रमेश, पवन खेडा आणि प्रशांत प्रताप यांनी स्मृती इराणींच्या मुलीबाबत काही टि्वट करीत टीका केली होती.
smriti irani
smriti iranisarkarnama

नवी दिल्ली : भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांची १८ वर्षीय कन्या झोईश इराणी ही गोव्यात एका बनावट लायसन्सवर सिली सोल्स अँड बार या नावाने बार रेस्टॉरंट चालवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. (Smriti Irani latest news)

पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी झोईश इराणी यांच्यावर गंभीर आरोप करीत स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला होता. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh), प्रवक्ते पवन खेडा आणि प्रशांत प्रताप (Prasahnt Pratap) यांनी स्मृती इराणींच्या मुलीबाबत काही ट्वीटही (Tweet) करीत भाजप व स्मृती इराणी यांच्यावर टीका केली होती.

याप्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेत या तीन काँग्रेसच्या नेत्यांवर मानहानीचा दावा ठोकला होता. याबाबत न्यायालयाकडून या तीनही कॉंग्रेस (congress) नेत्यांना समन्स (Summons) बजावण्यात आले आहे. न्यायालयाने या तीनही नेत्यांना स्मृती इराणींच्या मुलीबाबत केलेले सगळे टि्वट डिलीट (Delete) करण्यास सांगितले आहेत.

smriti irani
OBC Reservation : पुणे महापालिका ओबीसी आरक्षणात दिग्गजांना दणका

जयराम रमेश याला प्रत्युत्तर देत टि्वट केलं आहे. "आम्ही कोर्टासमोर तथ्य मांडण्याची वाट पाहत आहोत. स्मृती इराणी यांनी आम्ही आव्हान देऊ आणि त्यांचे आरोप खोटे ठरवू,” असे जयराम रमेश यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

"पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढत मी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जाब विचारला होता, त्याचा सुड म्हणून माझ्या मुलीवर हे आरोप करण्यात येत आहेत," अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. "2024 मध्ये कॉंग्रेसकडून राहूल गांधींनी अमेठी मधून लोकसभा निवडणूक लढवली तरी मी त्यांना पुन्हा एकदा पराभूत करेन," असे खुलं आव्हान स्मृती इराणी यांनी काँग्रेसला केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com