Politics : रस्त्यावर सहा हजार किलो गुलाबांच्या पाकळ्या अन्..; स्वागत पाहून प्रियंका गांधी भारावल्या

Priyanka Gandhi : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या स्वागताची जोरदार चर्चा
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi Sarkarnama

Congress News : छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या अधिवेशनात काँग्रेसच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. या अधिवेशनासाठी काँग्रेसचे देशभरातील दिग्गज नेते उपस्थित आहेत.

या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. मात्र, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या तयारीची मोठी चर्चा रंगली आहे.

Priyanka Gandhi
Kasba By-Election : धंगेकरांची उमेदवारी रद्द करा : भाजप तक्रार करणार; निवडणूक आयोगाची भूमिका काय?

प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी तब्बल दोन किलोमीटर रस्त्यावर चक्क सहा हजार किलो गुलाबांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली ही तयारी पाहून स्वत: प्रियंका गांधीही भारावून गेल्या. त्यांच्या या स्वागतासाठी संपूर्ण रस्ता हा गुलाबांच्या पाकळ्यांनी सजला होता.

Priyanka Gandhi
MVA News : उदय सामंत म्हणतात, महाविकास आघाडी फुटणार; युतीत येणाऱ्या आमदारांचा आकडाच सांगितला..

प्रियंका गांधी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर त्यांच्यावर गुलाबांची पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रंगीबेरंगी पारंपरिक वस्त्र परिधान केलेले कलाकार देखील उपस्थित होते. त्यांनी प्रियंका गांधी दाखल झाल्यानंतर आपल्या कलाही सादर केल्या. प्रियंका गांधींच्या या जंगी स्वागताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Priyanka Gandhi
Kasba By-Election : धंगेकरांची उमेदवारी रद्द करा : भाजप तक्रार करणार; निवडणूक आयोगाची भूमिका काय?

दरम्यान, रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी ही फुलांची व्यवस्था केली होती. नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक क्रेनद्वारे पुष्पवृष्टी केल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. मात्र, प्रियंका गांधी यांच्या या अगळ्या-वेगळ्या स्वागताची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या अधिवेशनात काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवासातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावेळी गांधी भारत जोडो यात्रेसह माझ्या राजकीय प्रवास थांबविण्याची वेळ आली, असे म्हणाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com