Nirmala Sitaraman :
Nirmala Sitaraman :

Nirmala Sitaraman : राजस्थानच्या कोटात 'या' राज्याच्या विद्यार्थ्यांची संख्या ऐकून सीतारामणांनाही बसला आश्चर्याचा धक्का

राजस्थानच्या काेटा येथे देशभरातून विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात.

Nirmala Sitaraman : राजस्थानच्या काेटा येथे देशभरातून विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवारी राजस्थान दौऱ्यावर असताना त्यांनी काेटा मध्ये काेचिंगच्या विद्यार्थ्यांशी ‘युवा शक्ती संवाद’ कार्यक्रमात संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी, इथे कोणत्या राज्याची किती मुले आहेत, असा सवाल त्यांनी विचारले. त्यांनी एक-एक करत राज्यांची नावे घेतली व मुलांनी हात वर करून आपल्या राज्याची उपस्थिती सांगितली. यात सर्वाधिक बिहार राज्याचे विद्यार्थी असल्याचे विद्यार्थ्यांनी सीतारामण यांना सांगितले. सीतारामण यांनी बिहारचे किती विद्यार्थी कोटा मध्ये असल्याचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ३७ हजार विद्यार्थी असल्याचे उत्तर दिले. विद्यार्थ्यांचे हे उत्तर ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला.

Nirmala Sitaraman :
Mahavitaran News : शिंदे-फडणवीस सरकार देणार जनतेला 'या' दरवाढीचा 'शॉक'?

कोटामध्ये बिहारचे ३७ हजार विद्यार्थी तर त्या खालोखाल महाराष्ट्राचे ३५ हजार विद्यार्थी, यूपीचे ३३ हजार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचे ३२-३५ हजार, पश्चिम बंगाल, ओडिशाचे १२,५००, हरियाणाचे जवळपास ११ हजार विद्यार्थी कोटामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत.

केंद्र सरकार केवळ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा वाढवण्यावर भर देत नाही, तर कुशल दर्जेदार शिक्षण देण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, देशाच्या विकासात युवा शक्तीची महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय लष्करामुळे देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत. देशात मोदी सरकार आल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात, रस्ते आणि रेल्वेच्या जाळ्यात प्रचंड विकास झाला आहे

कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलांनी अर्थमंत्री सीतारामन यांना कर भरणे, विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन, डिजिटल विद्यापीठ, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि यशस्वी उद्योजकता यासंबंधीचे प्रश्न विचारले. भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणा बाजूला ठेवून प्रामाणिकपणे कर भरण्याचा सल्ला असे सीतारामण यांनी दिला. तसेच, यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्वतःच्या क्षमतेनुसार जोखीम पत्करणे आवश्यक आहे, तरच यशस्वी उद्योजक होऊ शकतो,असही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in