भाजप नेत्याच्या हत्येतील गँगस्टरचा जामीन फेटाळला अन् न्यायाधीशांची हत्या झाली

ही घटना बुधवारी सकाळी घडली असून घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने उत्तम आनंद यांना धडक दिली.
भाजप नेत्याच्या हत्येतील गँगस्टरचा जामीन फेटाळला अन् न्यायाधीशांची हत्या झाली
SIT headed by City SP Dhanbad formed for investigation Uttam Anands Murder case

धनबाद : जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्याकडे अनेक गुन्हेगारी खटले सुरू होते. यातील एक खटला भाजप नेत्याच्या हत्येचा होता. या खटल्यात आरोपी असलेल्या गँगस्टरचा जामीन उत्तम आनंद यांनी नुकताच फेटाळला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी त्यांच्या हत्येचा संबंध जोडला जात आहे. (SIT headed by City SP Dhanbad formed for investigation Uttam Anands Murder case)

उत्तम आनंद हे धनबादचे जिल्हा न्यायाधीश होते. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने उत्तम आनंद यांना धडक दिली. उत्तम आनंद हे पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते रस्त्याचे कडेने चालत होते. त्याचवेळी काही अंतरापर्यंत रस्त्याच्या मधून जाणारी रिक्षा न्यायाधीशांच्या जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या दिशेने वळते आणि थेट त्यांना धडक देऊन पुढे निघून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले आहे. हत्येच्या उद्देशानेच रिक्षा धडकवण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. 

ही हत्या त्यांच्याकडे असलेल्या एका गँगस्टरमार्फतच घडवून आणल्याची चर्चा आहे. या घटनेला भाजप नेते रंजय सिंह यांच्या हत्येच्या सुनावणीशी जोडले जाऊ लागले आहे. रंजय हे झारखंडमधील धनबाद शहरातील बाहुबली सिंह मेंशन यांच्या जवळचे होते. त्यांची हत्या जानेवारी 2017 मध्ये गोळी मारून करण्यात आली होती. तसेच रंजय सिंह हे धनबादचे माजी आमदार संजीव सिंह याचेही निकटवर्तीय होते. रंजय सिंह यांच्या हत्येनंतर दोन महिन्यांनी धनबादच माजी उपमहापौर नीरज सिंह यांची हत्या करण्यात आली होती. 

रंजय यांच्या हत्येचा खटला उत्तम आनंद यांच्याकडे होते. मागील सुनावणी दरम्यान या खटल्यातील आरोपी अमन सिंह याचा जामीन त्यांनी फेटाळला होता. त्यानंतर काही दिवसांतच उत्तम आनंद यांची हत्या झाली आहे. त्यामुळे अमन सिंहच्या गँगवर हत्येचा संशय वाढला आहे. हत्येनंतर तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. हत्येत वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून दोन संशयितांना अटकही करण्यात आली आहे. या दोघांनी हत्येच्या उद्देशानेच रिक्षा अंगावर घातल्याचे कबूल केले आहे. या रिक्षाची दोन दिवसांपूर्वीच चोरी झाली होती. 

उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर संपूर्ण न्यायव्यवस्थाच हादरून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळी त्यांनी झारखंडच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा केल्याचे सांगितले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. याची आम्ही दखल घेतली असल्याचे रमणा यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in