आठवड्याभरात सिसोदियांना अटक होईल ; केजरीवालांचा दावा

Arvind Kejariwal : मला देशासाठी ४ महिने तुरूंगात राहावं लागलं तरी हरकत नाही,असे सिसोदिया म्हणाले
Arvind Kejariwal
Arvind Kejariwal

दिल्ली : दिल्लीतील राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संघर्ष थांबताना दिसत नाही. यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया आली आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआय मार्फत क्लीन चिट देण्यात आली आहे. पण राजकीय दबावामुळे त्यांना येत्या दहा दिवसात त्यांना अटक होईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Arvind Kejariwal
अण्णा हजारे केजरीवालांना म्हणाले, तुम्ही सत्तेच्या नशेत बुडाला आहात

यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी आपला बँक लॉकरबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये ७० ते ८० हजार रूपयांचे मुद्देमाल आढळून आले होते. सिसोदिया म्हणाले, 'मला सीबीआय मार्फत क्लीन चिट मिळाली आहे. यात कसलाही गैरव्यवहार यंत्रणांना आढळून आले नाही. सगळ्या गोष्टींचा माझ्याकडे हिशेब आहे. ते म्हणतात, तुम्हाला तुरूंगात घालावं लागणार, आमच्यावर दबाव आहे.' 'मला देशासाठी ४ महिने तुरूंगात राहावं लागलं, तरी हरकत नाही,असेही सिसोदिया म्हणाले.

Arvind Kejariwal
भाजपाध्यक्ष नड्डांना मुदतवाढ मिळणार? गडकरींसाठी बदललेल्या निर्णयाचा लाभ होणार

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारे यांनी अरविंद केजरीवालांना पत्र लिहून राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हजारे म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री सत्तेच्या नशेत चूर आहेत. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा पत्र लिहित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली राज्य सरकारच्या दारू धोरणाबाबत येत असलेल्या बातम्या वाचून खूप वाईट वाटले. गांधीजींच्या 'गावाकडे चला...' या विचाराने प्रेरित होऊन मी माझे संपूर्ण आयुष्य गाव, समाज आणि देशासाठी समर्पित केले आहे. गेली 47 वर्षे मी गावाच्या विकासासाठी काम करत असून भ्रष्टाचाराविरोधात जनआंदोलन करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com