मी फुकट डोस देण्याची तयारी दाखवूनही मोदी सरकार निर्णय घेईना! पूनावालांचा गौप्यस्फोट

मोदी सरकारच्या बूस्टर डोसबाबतच्या धोरणावर अदर पूनावालांनी टीका केली आहे.
Adar Poonawalla
Adar Poonawalla Sarkarnama

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण (Vaccination) मोहिमेत आता तिसरा म्हणजे प्रतिबंधात्मक डोस (Precaution dose) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. असे असले तरी याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही पावले उचलली जाताना दिसत नाहीत. याबाबत सिरमच्या अदर पूनावाला (Adar Poonwalla) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारला मोफत डोस देण्याची तयारी दाखवूनही सरकारनं निर्णय घेतला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

एका कार्यक्रमात बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, लस वाया जाऊ नये, म्हणून ती फुकट देण्याची तयारीही मी सरकारला दाखवली आहे. मात्र, सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. मी पैशाला महत्व देत असतो तर असे केले नसते. मी हे पैसे कमावण्यासाठी म्हणत नसून, मी आधीच तो खूप कमावला आहे. सिरमने 31 डिसेंबर 2021 पासून लस उत्पादन थांबवले आहे. लस वाया जाऊ नये, हेच कारण यामागे आहे. सध्या आमच्याकडे सुमारे वीस कोटी डोस पडून आहेत. दुसऱ्या लाटेत आपण तातडीने निर्णय घेतले, त्याप्रमाणे बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेणे ही सध्याची गरज आहे. दुर्दैवाने निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या महत्वाच्या व्यक्ती याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी वेळेवर बैठका घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही.

Adar Poonawalla
हार्दिक पटेलांना आता भाजपचं कौतुक! काँग्रेससाठी धोक्याचा इशारा

आगामी काळात बूस्टर डोस घेणे गरजेचे ठरणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करताना बूस्टर डोस बंधनकारक आहे. अनेक देशांनी बूस्टर डोस प्रवासासाठी बंधनकारक केला आहे. याचबरोबर कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर झालेल्या अनेक संशोधनातून हे समोर आलं आहे. दोन डोसमधील अंतर जास्त असल्यास अँटीबॉडी कमी होतात. त्यामुळे दोन डोसमधील अंतर नऊवरून सहा महिने करावं, असेही पूनावालांनी स्पष्ट केलं.

Adar Poonawalla
पुन्हा पहिल्यासारखाच लालफितीचा कारभार! पूनावालांनी मोदी सरकारला सुनावलं

कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस 600 रुपयांना मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते. पण यानंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी या डोसची किंमत केल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, खासगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड (Covid 19) प्रतिबंधक लशीचे डोस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल पासून 18 वर्षांवरील वयोगटाला खबरदारीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले सर्वजण यासाठी पात्र आहेत. ही सुविधा सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com