राहुल गांधींची भेट झाली अन् सिद्धूंनी तलवार म्यान केली!

10 महिन्यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
राहुल गांधींची भेट झाली अन् सिद्धूंनी तलवार म्यान केली!
rahul gandhi, navjot singh sidhusarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसचा पंजाबमधील (Punjab Congress) अंतर्गत कलह आता शांत होत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) भेट घेतल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सिद्धूंची भेट घेतली. त्यानंतर सिद्धूंनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. आता नवज्योतसिंग सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राहणार आहेत.

10 महिन्यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पक्षांतर्गत वादाचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. नवज्योगसिंह सिद्धूंनी बैठकीनंतर म्हटले, सर्व काही व्यवस्थित झाले आहे. मी हायकमांडला माझ्या मनातील काळजी सांगितली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी चांगला असेल, त्यावर माझा विश्वास आहे. मी त्यांना सर्वोच्च मानत आहे, त्यांच्या आदेशाचे पालन करत आहे, असे ते म्हणाले.

rahul gandhi, navjot singh sidhu
गिरीश महाजन, अजितदादा, जयंत पाटील अन् राधाकृष्ण विखे पाटील करणार चित्रपटात भूमिका!

काँग्रेस नेते हरिष रावत म्हणाले की, सिद्धू यांनी आपले मुद्दे राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल आश्वासन देण्यात आले. राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सिद्धू यांनी स्वीकारली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नाराजीला न जुमानता काँग्रेसने 18 जुलै रोजी सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

rahul gandhi, navjot singh sidhu
सोनियांच्या जागी काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष! कार्यकारी समितीच्या बैठकीत मोठा निर्णय

अंतर्गत वादातून अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चन्नी हे सिद्धूचे जवळचे मानले जातात. मात्र, 28 सप्टेंबर रोजी सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.