UPSC Result : श्रुती शर्मा देशात अव्वल ; टॉप 10 मध्ये 4 मुली : प्रियंवदा म्हाडदळकरला 15 वी रँक

अंकिता अग्रवाल,गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
Shruti Sharma
Shruti Sharmasarkarnama

नवी दिल्ली :केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (upsc)घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. टॉप 10 मध्ये 4 मुलींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर हिने 15 वी रँक मिळवली आहे.

श्रुती शर्मा (Shruti Sharma) ही देशातून पहिली आली आहे. अंकिता अग्रवाल,गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे.

युपीएससीची प्रिलिम परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 ला झाली होती. त्याचा निकाल 29 ऑक्टोबर दिवशी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी दरम्यान घेण्यात आली आणि 17 मार्चला निकाल जाहीर झाला. त्यानंतर 5 एप्रिल पासून 26 मे पर्यंत मुलाखतीच्या फेर्‍या सुरू होत्या, आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे.

Shruti Sharma
राकेश टिकैत यांच्यावर हल्ला ; दोन संघटना भिडल्या, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

पहिल्या चारही क्रमाकांवर मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. युपीएससी परीक्षेचा निकाल प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी अशातीन टप्प्यातील मार्क्स एकत्र करून अंतिम निकाल बनवला जातो. यामधून क्रमवारी नुसार आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी निवडले जातात.

Shruti Sharma
राज्यसभेसाठी मी पात्र नाहीये का ? ; नगमांचा सोनियांना सवाल, धुसफुस चव्हाट्यावर

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये सेवेची संधी मिळणार आहे.

लातूरच्या शुभम भोसलेचे यश

आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला त्यात लातूर जिल्ह्यातील औसा येथील शुभम संजय भोसले हा विद्यार्थी देशातून 149 व्या क्रमांकावर यशस्वी झाला आहे तर उदगीर येथील रामेश्वर सब्बनवाड हा विद्यार्थी 202 क्रमांकावर यशस्वी झाला आहे.

टॉप 10 परीक्षार्थी

1. श्रुती शर्मा

2. अंकिता अग्रवाल

3. गामिनी सिंगला

4. ऐश्वर्य वर्मा

5. उत्कर्ष द्विवेदी

6. यक्ष चौधरी

7. सम्यक एस जैन

8. इशिता राठी

9. प्रीतम कुमार

10. हरकीरत सिंग रंधावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com