Shraddha Walkar ला मारल्याचा पश्चाताप नाही; पॉलीग्राफ चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे

बंबल या डेटिंग अॅपवरुन आफताब हा हिंदू मुलींना शोधायचा आणि आपल्या जाळ्यात अडकवायचा.
Shraddha Walkar news Update
Shraddha Walkar news UpdateSarkarnama

Shraddha Walkar murder case update | श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीत आरोपी आफताबने धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धासोबतच्या नात्याआधी आफताब हा डेटिंग अॅपवरून हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा. इतकंच नाही तर त्याने श्रद्धासोबत नात्यात असतानाही २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते, असा जबाब त्याने पॉलीग्राफ चाचणीत पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

धक्कादायक म्हणजे, मला फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील, असं विधान आरोपी आफताबने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आफताबच्या या विधानामुळे तो कट्टर मानसिकतेचा असावा, असा सवाल उपस्थित होत आहे. बंबल या डेटिंग अॅपवरुन आफताब हा हिंदू मुलींना शोधायचा आणि आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धाची हत्या (Crime News) केल्यानंतर त्याने पुन्हा एका हिंदू मुलीशीच संबंध ठेवले होते. त्याने श्रद्धाची अंगठी भेट देऊन तिला आपल्या जाळ्यात अडकवले, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.

Shraddha Walkar news Update
Jat News : जतसंदर्भात पुढच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय होणार; आमदार सावंतांनी घेतली शिंदेंची भेट

याहून धक्कादायक म्हणजे श्रद्धाची हिची हत्या करुन त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि काही दिवसात त्याने तुकड्यांची विल्हेवाट लावली. अशी कबूली दिली असली तरी, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चापात दिसत नाही. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असंही त्याने पॉलीग्राफ चाचणीत म्हटलं असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

दिल्लीतील मेहरौली येथे फ्लॅट घेतल्यानंतर 18 मे रोजीही दोघांमध्ये भांडण झाले होते. श्रद्धा लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. या मुद्द्यावरून दोघांमध्येही सातत्याने वाद होत होते. अनेकदा तो श्रद्धाला मारहाणही करायचा. पण एक दिवस आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री मृतदेहाचा एक एक तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. त्याने हे 20 दिवस केले.

या चाचणीदरम्यान त्याला सुमारे 40-50 प्रश्न विचारण्यात आले. आफताबचे बालपण, मित्र इथपासून ते श्रद्धाची भेट, डेटींग ते हत्येपर्यंत काय घडले असे अनेक प्रश्न विचारले गेले. आफताबने श्रध्दाच्या हत्येचा कट कसा रचला आणि कशी तिची हत्या केली. हाही प्रश्नही आफताबला विचारण्यात आला. याशिवाय, त्याचं बालपण आणि मित्रांबद्दलही विचारपूस करण्यात आली. असं कोणतं कारण होतं की त्याने श्रद्धाची हत्या केली?, त्याने जाणीवपुर्वक कट रचून तिची हत्या केली की रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली, असेही त्याला विचारण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com