Shraddha Murder Case : पाॅलिग्राफ टेस्टनंतर आफताबची नार्कोटेस्टही होणार!

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या हत्येविषयी विचारतात तेव्हा आफताबला राग येतो.
Shraddha Murder Case : Aftab
Shraddha Murder Case : AftabSarkarnama

दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Murder Case) हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, हत्येचा उलगडा करत असताना रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती आतापर्यंत अनेक पुरावे हाती लागले आहेत. श्रद्धाची हत्या करणाऱ्या आरोपी आफताबची आता नार्कोटेस्ट होणार आसल्याचे समोर आले आहे. 1 डिसेंबरला रोजी आफताबची नार्को होणार आहे. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

Shraddha Murder Case : Aftab
Story Behind Bornare's Viral Video : आमदार रमेश बोरनारे प्रकरणात नेमकं काय घडलं ?

तिहार तुरुंगातून दिल्ली पोलिसांची तिसरी बटालियन सकाळी साडेसातच्या सुमारास आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. 1 डिसेंबरला सकाळी 9 वाजणयाच्या सुमारास आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अगोदर आफताबचे वैद्यकीय चाचणी केली जाईल.

आफताबची पूर्ण आरोग्य तपासणी झाल्यानंतरच, नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. तिहारच्या तुरूंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची पॉलीग्राफ टेस्ट झाल्यानंतर आफताबचं वर्तन सामान्य असल्याचे समजत आहे.

Shraddha Murder Case : Aftab
Abdul Sattar : सत्तारांनी दीड महिन्यातच लाडक्या अधिकाऱ्याला कृषी आयुक्त केले...

कारागृहात रवानगी केल्यानंतर आफताबने तुरूंगाच्या सामान्य नियमानुसार दिलेले जेवण खाल्ले. आफताब बंद कोठडीत 2 अंडरट्रायल कैदी चोरीच्या प्रकरणीतिहार तुरुंगात बंद आहेत. या कैद्यांशी बोलताना आफताबने तुरूंगातील जेवणाच्या दर्जाविषयी चर्चा केली. मात्र, जेव्हा हे कैदी जेव्हा त्याला श्रद्धाच्या हत्येविषयी विचारतात तेव्हा त्याला राग येतो. श्रद्धा्चया विषयावर त्याला बोलणार नाही, असे तो सांगतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com