रिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर तीन महिन्यानंतर मिळाला जामीन

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. एनसीबीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह काही जणांना अटक केली होती.
showik chakraborty gets bail after three months in ndps case
showik chakraborty gets bail after three months in ndps case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. याआधी उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला होता मात्र, शौविकचा जामीन फेटाळला होता. विशेष न्यायालयाने अखेर आज शौविकला जामीन मंजूर केला आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. 

रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना एनसीबीने 4 सप्टेंबरला अटक केली होती. न्यायालयाने रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ती भायखळा कारागृहात तर, शौविक हा तळोजा कारागृहात होता. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते.

उच्च न्यायालयाने 10 ऑक्टोबरला रियाला जामीन मंजूर केला होता मात्र, शौविकचा जामीन फेटाळला होता. रियाला अटक झाल्यानंतर महिनाभराने तिची सुटका झाली होती. अखेर शौविक याला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुमारे तीन महिन्यानंतर शौविकला जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्याचा कारागृहातून सुटण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले होते. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com