निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नेत्यांचे शोलेस्टाईल आंदोलन; थेट टॉवरवरच चढत दिली धमकी

Delhi Municipal Election : दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे
Delhi Municipal Election
Delhi Municipal ElectionSarkarnama

Delhi Municipal Election : दिल्लीत (Delhi) होणाऱ्या महापालिका निवडणुकीत (Municipal Election) तिकीट न मिळाल्याने आम आदमी पक्षाच्या (AAP) एका नेत्याने रविवारी टेलिफोन टॉवरवर चढून फेसबुक लाईव्ह केले. पूर्व दिल्लीचे माजी नगरसेवक हसीब-उल हसन यांनी टॉवरवर चढून आम आदमी पक्षाचे नेते आतिशी आणि दुर्गेश पाठक त्यांची कागदपत्रे परत करत नसल्याचा आरोप केला.

Delhi Municipal Election
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगावमधील सभेला पवार, ठाकरे उपस्थित राहणार..

या आरोपांवर 'आप'च्या नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हसन यांनी टॉवरवर चढल्यानंतर सांगितले की जर मी खाली पडलो आणि काही बरे वाईट झाले तर आम आदमी पार्टी आणि आतिशी यांच्यासह दुर्गेश पाठक जबाबदार असतील. हसीब-उल हसन यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की 'आज मला काही झाले किंवा माझा मृत्यू झाला तर आम आदमी पार्टीचे दुर्गेश पाठक आणि आतिशी जबाबदार असतील. त्यांच्याकडे माझ्या बँकेच्या पासबुकसह माझी मूळ कागदपत्रे आहेत.'

"सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, ते मला माझी कागदपत्रे देत नाहीत, हसीब-उल हसनने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. म्हणाले आहे की, पक्षाने त्यांना निवडणुकीत तिकीट दिले की नाही, याची चिंता नाही, तर त्यांची कागदपत्रे परत हवी आहेत.

Delhi Municipal Election
भाजपचे बंडखोर मोदी-शहांना आणणार अडचणीत; दिली 'ही' धमकी

हसन यांनी या वर्षाच्या सुरूवातीलाही असेच आंदोलन केले होते. मार्चमध्ये, शास्त्री पार्कमधील गटार साफ करण्यासाठी त्यांनी नाल्यात उडी मारली होती. नाल्यात उडी मारून त्यांनी अनोखे आंदोलन केले होते. त्यामुळे ते वेगळ्या आंदोलनासाठी ओळखले जातात. मात्र, महापालिका निवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनी टॉवरवर चढत आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com