सुएझमधील कोंडी : महाकाय एव्हर गिव्हन जहाज अडकण्यास सुएझ कालवा प्राधिकरण जबाबदार

सुएझ कालव्यात अडकलेले जहाज आठवडाभरानंतर दुसरीकडे हलवण्यात यश आले होते. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी सुटली होती.
shoei kisen ship company blames suez canal authority of canal blockage
shoei kisen ship company blames suez canal authority of canal blockage

सुएझ : सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन (Ever Given) हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले होते. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली होती. परंतु, नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर या जहाजाची झालेली कोंडी अजूनही कायम आहे. हे जहाज अडकण्यास सुएझ कालवा प्राधिकरणच (Suez Canal Authority) जबाबदार आहे, असा दावा या जहाजाची  कंपनी शोई कायसेन (Shoei Kisen) केला आहे. 

एव्हर गिव्हन हे 2 लाख टनांचे महाकाय जहाज 23 मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. आठवडाभरानंतर म्हणजेच 29 जुलैला अथक प्रयत्नांनंतर हे जहाज अखेर बाहेर काढण्यात यश आले होते. या जहाजामुळे आशिया आणि युरोपकडे दररोज जाणाऱ्या तब्बल 9.6 अब्ज डॉलरच्या मालाची वाहतूक थांबली होती. याचबरोबर सुएझ कालवा बंद पडल्याने इजिप्तला दररोज सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलरचा फटका बसला होता. 

आता या नुकसानामुळे  सुएझ कालवा प्राधिकरणाने हे जहाज रोखून धरले आहे. एकप्रकारे हे जप्त केले असून, जहाजाच्या कंपनीकडे तब्बल 90 कोडी डॉलरची मागणी केली होती. कंपनीने ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने हे जहाज कालवा प्राधिकरणाने जप्त केले आहे. दरम्यान, जहाजाची कंपनी शोई कायसेन कैशा, कालवा प्राधिकरण आणि विमा कंपनी यांच्यात यावर चर्चा होती. यातून तोडगा न निघाल्याने प्रकरण न्यायालयात गेले आहे .    

शोई कायसेन कंपनीच्या वकिलांना न्यायालयात सांगितले की, जहाज अडकण्यास सुएझ कालवा प्राधिकरण जबाबदार आहे. खराब हवामान असतानाही जहाजाला कालव्यात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सर्व घटनाक्रमात जहाजाची चूक होती हे सिद्ध करण्यात प्राधिकरण अपयशी ठरले आहे. प्राधिकरणाचे पायलट आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संभाषणाचे तपशीलही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यात जहाजाला कालव्यात प्रवेश द्यावा की नाही याबद्दल चर्चा आहे. जहाजासोबत दोन टग बोट देण्यात आल्या असल्या तर हा अपघात घडला नसता. 

यावर अद्याप प्राधिकरणाने प्रतिक्रिया दिलेली नाही. शोई कायसेनच्या वकिलांनी एव्हर गिव्हन जप्त करणे बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. कालव्यात अडकलेल्या जहाजाची सुटका करणे हे प्राधिकरणाचे काम आहे. यासाठी ते पैसे मागू शकत नाहीत. कालव्यातील वाहतुकीचे नियंत्रण ही प्राधिकरणाची जबाबदारी आहे. प्राधिकरणाने जहाज जप्त केल्याने कंपनीने 1 लाख डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com