Ram Mandir : खळबळजनक! अयोध्येतील राम मंदिर आत्मघातकी हल्ल्याद्वारे उडवून देण्याची धमकी

Terrorist Attack News : ...याआधीही जिहादी संघटनेची राम मंदिर उडवून देण्याची धमकी
Ayodhya ram mandir
Ayodhya ram mandir Sarkarnama

Ayodhya Ram Mandir News : अयोध्येतील राम मंदिराचं काम ६५ टक्के पूर्ण झालं आहे. पुढील वर्षी या राम मंदिरांचं लोकार्पण केलं जाणार असल्याची घोषणाही भाजप नेते व गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. परंतू, याचवेळी अयोद्धेतील निर्माणाधीन राम मंदीर आत्मघाती बॉम्बने उडवून देण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनी दिली आहे. या धमकीमुळं एकच खळबळ उडाली असून केंद्रीय तपासयंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराची सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी नेपाळमार्गे भारतात येणार असून तेच आत्मघाती बॉम्बद्वारे राम मंदिर (Ram Mandir) उडवून देणार आहेत अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

Ayodhya ram mandir
Maharashtra Kesari News: महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी; प्रकरण पोलीस ठाण्यात पोचले

तसेच जैश ए मोहम्मदसह इतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर पंजाब आणि दिल्ली ही राज्ये सुध्दा आहेत. त्यामुळं राजधानी दिल्लीसह पंजाबमध्ये देखील महत्त्वाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयित व्यक्ती आणि वस्तूवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Ayodhya ram mandir
Mahavikas Aghadi News: आघाडीचा घोळ मिटेना; सूत्र पवारांच्या हातात, उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांशी चर्चा

काही दिवसांपूर्वी 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यार ताब्यात घेतली आहे. या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर हिंदू नेते होते. ही माहिती देखील आता समोर आली आहे. एकंदरीत दहशतवाद्यांचं टार्गेट राम मंदिर आणि हिंदू नेते असल्याची दोन घटनांमधून समोर आली आहे. त्यामुळं दहशतवादी हिंदू धर्मातील लोकांना टार्गेट करत असल्याचं यावरून दिसून येत आहे.

...याआधी जिहादी संघटनेची मंदिर उडवून देण्याची धमकी

अयोध्या येथील राम मंदिराचे उभारणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असतानाच दहशतवादी संघटनांकडून राम मंदिर उडवून देण्याच्या धमकी दिल्या जात आहेत. आधी आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेनं गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्या येथील तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचं म्हटलं होतं. तर आता जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनंही राम मंदिर आत्मघातकी हल्ल्याद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in