Delhi News : धक्कादायक; महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच विनयभंग !

मालीवाल या दिल्ली एम्सच्या गेटजवळ महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी थांबल्या होत्या.
Delhi Crime News
Delhi Crime News Sarkarnama

Delhi Crime News : दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाच एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली (Delhi) एम्सजवळ ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१८ जानेवारी) रात्री उशिरा ही घटना घडली. स्वाती एम्सच्या गेट क्रमांक २ जवळ उभ्या होत्या. एक कार चालक तिथे आला आणि त्याने मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. स्वाती यांनी कार चालकाला फटकारले असता त्याने तात्काळ गाडीची काच वर केली. या झटापटीत स्वाती यांचा हात कारच्या खिडकीत अडकला आणि चालकाने त्यांना 10 ते 15 मीटरपर्यंत फरफटत नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, PCR वर पहाटे 3.11 वाजता त्यांना कॉल आला की पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारच्या चालकाने एका महिलेसोबत अश्लील इशारे करत तिला कारने फरफटत नेले. पण महिलेला वाचवण्यात यश आले.

Delhi Crime News
Parliament Budget Session 2023 : मोदी सरकारचे दाबे दणाणले ; अर्थमंत्रालयाची माहिती एकाने परदेशी लोकांना पुरवली...

मालीवाल यांनी पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. मालीवाल या दिल्ली एम्सच्या गेटजवळ महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी थांबल्या होत्या. तिथे एक कार चालक आला आणि त्याने त्यांना गाडीत बसण्यास सांगितले. पण त्यांनी नकार देताच त्याने त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मालीवाल यांनी त्याला फटकारले असता त्याने गाडीची काच वर घेतली. पण या झटापटीत त्यांचे हात काचेत अडकले. कार चालकाने त्यांना दहा ते पंधरा मीटर फरफटत नेले. पण त्या कशाबशा आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाल्या.

या प्रकरणी पोलिसांनी हरिश चंद्र (47) नावाच्या इसमाला अटक केली आहे. तो दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी स्वाती यांच्यासोबत त्यांच्या टीमचे आणखी काही लोक उपस्थित होते. त्यांच्या वतीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्या भागात सीसीटीव्ही नसल्यामुळे त्या व्हिडिओच्या आधारे पोलिसही अधिक तपास करण्याच्या तयारीत आहेत. सध्या आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावर स्वाती मालीवाल यांच्या वतीने एक व्हिडिओ संदेशही जारी करण्यात आला आहे. त्या मेसेजमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी नुकतीच दिल्ली महिलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने माझ्याकडे अश्लील हावभाव केले. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने खिडकी बंद केली आणि माझा हात अडकला. तो कित्येक मीटर्स ओढत राहिला. मी खूप नशीबवान होते, अंजलीसारखे काही माझ्यासोबतही झाले असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com