धक्कादायक! माजी परिवहन मंत्र्याची गोळी झाडून आत्महत्या

Rajendra Bahuguna Suicide case| सुनेने केलेल्या आरोपांमुळे ते व्यथित झाले होते.
धक्कादायक! माजी परिवहन मंत्र्याची गोळी झाडून आत्महत्या
Rajendra Bahuguna

Uttarakhand Crime news

उत्तराखंंड : माजी परिवहन मंत्र्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तराखंडचे माजी परिवहन मंत्री राजेंद्र बहुगुणा (वय ५९) यांनी बुधवारी (२५ मे) स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. सुनेने केलेले आरोप सहन न झाल्यामुळे व्यथित झालेल्या बहुगुणा यांनी अखेर मृत्यूला कवटाळल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

एसएसपी पंकज भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर नातीची छेड काढल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सुनेने केलेले आरोप त्यांच्या जिव्हारी लागले होते. त्यातून त्यांची मानसिक अस्वस्थता वाढली होती. अखेर बुधवारी ते हल्दाना येथील भगत सिंग कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढले. त्यापूर्वी त्यांनी 112 (आपातकालीन नंबर)नंबरवर फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे कळवले.

Rajendra Bahuguna
आरक्षण मिळो न मिळो, राजकीय पक्ष ओबीसींना कोटा देणार

बहुगुणा यांच्या फोननंतर पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवण्याची विनंती केली. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन बहुगुणा खालीही उतरले मात्र, अचानक त्यांनी पिस्तूल काढली आणि स्वत:वरच गोळी झाडली. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकऱणी त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलहामुळे राजेंद्र बहुगुणा यांची सून आपल्या पतीसोबत राहात नव्हत्या. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांच्या सूनेने बहुगुणा यांच्यावर नातीची छेड काढल्याचा आरोप केला. सूनेने केलेल्या आरोपाने त्यांना मानसिक धक्काच बसला होता. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे. दरम्यान या प्रकरणी आता बहुगुणा यांच्या मुलाने आपल्या पत्नी विरोधात वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in