संसदेला कोरोनाचा विळखा; 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना संसर्ग

संसदेच्या दोन्ही सभागृहातील अनेक कर्मचारी कामाच्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात आले होते.
Parliament  house
Parliament houseANI/@Twitter

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session of Parliament) काही दिवस शिल्लक राहिलेले असताना संसंदेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संसदेतील 400 हून अधिक संसद कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा (corona Virus) संसर्ग झाला आहे. या सर्व सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत 400 हून अधिक कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.

अधिकृत सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 8 जानेवारी या कालावधीत केलेल्या तपासणीदरम्यान संसदेच्या 1,409 कर्मचार्‍यांपैकी 402 कर्मचार्‍यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आता सर्व नमुने ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) पुष्टीकरणासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

Parliament  house
भाजपच्या पराभवासाठी ममतांनी टाकले फासे; मोठी राजकीय उलथापालथ होणार?

संसदेच्या कर्मचार्‍यांच्या देण्यात आलेल्या अंतर्गत निर्देशानुसार, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना निर्बंधांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संसदेतील कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी, लोकसभेतील 200 सदस्य, राज्यसभेतील 69 आणि इतर 133 सहयोगी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांना कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

संसदेच्या दोन्ही सभागृहातील अनेक कर्मचारी कामाच्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या विविध अधिकाऱ्यांचेही विलगीकरण करण्यात आले आहे.

डीडीएमएने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार, सर्व सरकारी कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या क्षमतेखाली चालवण्याचे निर्देश दिले आहेत आणि बाकीच्यांना वर्क फ्रॉम होम करतील, कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना उपस्थितीसाठी बायोमेट्रिक (दैनिक पंचिंग) पासून सूट दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com