
Shivsena Rajesh Kshirsagar to Visit Satara : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेनेने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपवली आहे. ते येत्या सोमवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख राजेश क्षीरसागर प्रथमच सोमवारी (ता.१३ ) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सकाळी ११.०० वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीद्वारे ते लोकसभा मतदारससंघाचा आढावा घेणार आहेत. यानंतर दुपारी १२.०० वाजता शासकीय विश्रामगृह येथेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २०१९ मध्ये क्षीरसागर यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली.
नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारच्या मित्र संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीमध्येही क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी झाली आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यात शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवून शिवसैनिकांची मोट बांधून शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी राजेश क्षीरसागर यांच्यावर संपर्कप्रमुख पदाच्या निवडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपविली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.