राऊतांनी मोदी, नड्डांना सुनावले खडे बोल!

दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून, असा सल्ला शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
bjp national meeting
bjp national meetingsarkarnama

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (jp nadda) यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिला आहे. या आदेशाचा शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र 'सामना'तून भाष्य करण्यात करण्यात आले आहे. भाजपवर (bjp) सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून, असा सल्ला शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.

bjp national meeting
आता मोदींना कुठली शिक्षा द्यावी ; नवाब मलिकांचा प्रश्न

''राष्ट्रीय कार्यकारिणी सुरू असतानाच ऐतिहासिक, पण अमानुष नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नोटबंदीमुळे भ्रष्टाचार नष्ट होईल असे सांगितले होते. काळा पैसा परत देशात येईल, अर्थव्यवस्था ‘कॅशलेस’ होईल, दहशतवाद संपून जाईल, असे सांगितले. हे सर्व खरेच झाले काय? यावर कार्यकारिणीत साधकबाधक चर्चा व्हायला काहीच हरकत नव्हती. या सगळ्या प्रकरणांत जनतेचे हाल झाले. त्यामुळे बेहाल जनतेचा विश्वास भाजपाने गमावला आहे. नोटबंदीमुळे अतिरेक्यांना अर्थपुरवठा करणारा अमली पदार्थांचा व्यापार बंद पडेल, असे जोरात सांगितले गेले. प्रत्यक्षात भाजपाचे हस्तक आणि पदाधिकारी हे अमली पदार्थांच्या व्यवहारात कसे गुंतले आहेत त्याचा पर्दाफाश मुंबईत रोज सुरू आहे,'' असं अग्रलेखात म्हटलं आहे.

‘त्या’ प्रकरणात आर.आर. पाटलांचा दोष नव्हता, फडणवीसांनी केला खुलासा...

नागपूर : एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावरून सुरू झालेला देवेंद्र फडणवीस आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद लवंगी फटाक्यांवरून आता बॉम्ब फोडण्यापर्यंत आला आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या अंडरवर्ल्डच्या लोकांशी मलिकांचे थेट संबंध असल्याचा बॉंबगोळा आज फडणवीसांनी टाकला. त्याच काळात स्व. आर. आर. पाटील यांचे गुन्हेगारांसोबतचे फोटो मिडियाने छापले होते, पण आर. आर. पाटलांचा त्यात काही दोष नव्हता, असे फडणवीस यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले. फडणवीस म्हणाले, आर. आर. पाटील इफ्तार पाटीला गेले होते आणि त्याच पार्टीतील गुन्हेगारांसोबतचे त्यांचे फोटो मिडीयाने छापले होते. तो सलीम पटेल होता, हा दाऊचा माणूस आहे. फराज मलिक नवाब मलिकांचे सुपुत्र आहेत आणि कुर्ल्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात त्यांचा थेट संबंध आहे. त्यांचे संबंध १९९३ मध्ये होते की पूर्वीपासूनचे आहे, हे तपासात उघड होणारच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in