शिवसेना गोव्याच्या मैदानात पण भाजपचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच!

Goa Election Update : भाजपचे उदाहरण देत शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात...
Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
Uddhav Thackeray - Devendra Fadnavis Sarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांचे (Goa Assembly Election) पडघम वाजल्यापासून त्याठिकाणी युती आणि आघाडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. आता निवडणूक अगदी तोंडावर आली असताना देखील हे राजकारण थांबण्याची चिन्ह नाहीत. अजूनही गोव्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी, तृणमूल-काँग्रेस-आप अशा पक्षांची युती होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

मात्र या सगळ्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस (Congress) सोबत युती नाही झाली तर शिवसेना (Shivsena) स्वबळावर किंवा राष्ट्रवादीसोबत (NCP) लढेल असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या गोवा निवडणूक धोरणावर त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना राऊत सातत्याने भाजपचे (BJP) उदाहरण देत होते आणि त्याच धोरणावर आपण चाललो असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेना गोव्याच्या मैदानात (Goa Assembly Election) उतरली असली तरी भाजपच्या आदर्शावर अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
फडणवीसांनी हात झटकले; उत्पल पर्रीकरांची जबाबदारी आता शिवसेनाच्या खांद्यावर

यावेळी संजय राऊत म्हणाले, काँग्रेससोबत आमची काही काळ चर्चा सुरु होती. मात्र गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्या लाटेवर तरंगत आहेत. चालूद्या त्यांचे. तडाखे बसतात मग कळेल. पण कोणाशीही युती नाही झाली तर शिवसेना स्वबळावर किंवा राष्ट्रवादीसोबत लढेल. कारण शिवसेना गोव्यात पहिल्यांदा लढत (Goa Assembly Election) नाही. प्रत्येक निवडणुकीत शिवसेना वाढत गेली. सुरुवातीला १९८९ साली गोव्यात भाजप देखील १२-१३ जागांवर लढला होता, तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
सिंधुदुर्ग जिल्हा बँक 'राणेमय' : बाळासाहेबांसह शरद पवार, सोनिया गांधींचे फोटो गायब

मात्र राजकारणात, निवडणुकीत सुरुवातीच्या काळात अशा घटना होत असतात. भाजपच्या उमेदवारांची एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचे डिपॉझिट गेले होते. कालच्या लोकसभेत काँग्रेसच्या बहुसंख्य उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणून काय लढायच नाही का? असाही सवाल राऊतांनी विचारला. शिवसेना, ठाकरे सरकारचा प्रभाव, त्यामुळे गोव्यात शिवसेना चांगले मतदान मिळेल अशी आशा व्यक्त करत त्यांनी भाजपला कधीही स्वबळावर राज्य मिळालेले नाही, अगदी पर्रिकरांच्या काळातही नाही आणि यंदा देखील लोक भाजपला निवडून देणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in