'यूपी'त राजकीय भूकंप होणार; अखिलेश यांच्या काकांनी उचललं मोठं पाऊल

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आता मोठा धक्का बसू शकतो.
Akhilesh Yadav News, Yogi Adityanath News, Shivpal Yadav News, UP Political News Updates
Akhilesh Yadav News, Yogi Adityanath News, Shivpal Yadav News, UP Political News UpdatesSarkarnama

लखनौ : विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना आता मोठा धक्का बसू शकतो. निवणुकीआधी अखिलेश यांच्या आघाडीसोबत असलेले त्यांचे काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांनी काही दिवसांपूर्वी आमदारकीची शपथ घेण्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी मोठं पाऊल उचलतं खळबळ उडवून दिली. (UP Political News Updates)

शिवपाल यादव यांनी आपल्या प्रगतीशील समाजवादी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीसह राष्ट्रीय आणि सर्व विभागीय कार्यकारणी, समित्या, प्रवक्ते, विविध सेल बरखास्त केले आहेत. यादव यांची ही कृती राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप घडवण्याच्यादृष्टीने टाकलेले पहिलं पाऊल असू शकतं, अशी चर्चा उत्तर प्रदेशात सुरू झाली आहे. यादव हे भाजपमध्ये (BJP) जाऊ शकतात, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Akhilesh Yadav News, Yogi Adityanath News, Shivpal Yadav News, UP Political News Updates
रतन टाटांना 'संघा'विषयी काय वाटत होतं? गडकरींनीच सांगितला किस्सा

शिवपाल यादव यांचे पुत्र व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदित्य यादव यांनी बरखास्तीचे आदेश काढले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत अद्याप शिवपाल किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. भाजपचा पाठिंबा असलेल्या समान नागरी कायद्याला अन्य विरोधकांकडून विरोध होत असताना त्यांनी गुरूवारी कायद्याला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

शिवपाल यादव यांचा प्रगतीशील समाजवादी पक्ष अखिलेश यांच्या आघाडीसोबत आहे. पण मागील काही दिवसांत त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपाल यादव हे मोठ्या संघटनात्मक भूमिकेसाठी आग्रही होते. पण अखिलेश यांच्या सुचना होती की, शिवपाल यांनी सपाच्या समर्थनातून आपल्या राजकीय पक्षाचा विस्तार करावा. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडके उडाल्याची चर्चा आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवपाल यादव त्यादृष्टीने भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

शिवपाल यादव यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी सपामधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. पण त्यानंतरही त्यांची सपातील अनेक नेत्यांशी जवळीक असल्याचे बोलले जाते. ते सहावेळा आमदार राहिलेले आहेत. सपाने 2017 मध्ये 47 तर 2024 मध्ये 125 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे अखिलेश यांना लोकसभेतही चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत पूर्ण लक्ष राज्यात केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता काकांची भूमिका त्यांच्या अडचणी वाढवू शकते, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com