ShivSena News : ठाकरेंनी आयोगात डाव उलटवला; शिंदेंच्या पदावरही प्रश्न...

ShivSena News : केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.
Uddhav Thackeray, Eknath Shinde News, ShivSena News
Uddhav Thackeray, Eknath Shinde News, ShivSena NewsSarkarnama

ShivSena News : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. या सुनावणीत महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आहेत.

सिब्बल यांनी बाजू माडतांना म्हटले होते, ''त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पीत काल्पनिक आहे. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फूटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला,'' असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde News, ShivSena News
Shivsena Symbol News : शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने काढले खोडून...सिब्बल यांचा महत्त्वाचा युक्तीवाद

शिंदे गटाच्या कागद पत्रांमध्ये अनेक त्रूटी आहेत. शिंदे गटाच्या याचीकेमध्ये अनेक त्रूटी आहेत, शिंदे गटाचे बंड पक्षाच्या आवस्थेवर परिनाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांनी दावा केला. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर नसल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.

तसेच, मागच्यावेळी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह शिंदे गटाच्या वकिलांनी उपस्थित केले होते. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेता पदावर ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर घटना अवैध आहे असे म्हणतात तर मग हे पद कुठल्या घटनेत आले, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला. त्यामुळे शिंदे गटाने टाकलेला टाव ठाकरेंनी उलटवला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिंदे गटाची कागदपत्रे खरी असतील तर ओळख परेड करा, असे सिब्बल म्हणाले आहे. आम्ही लाखो कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे पक्षावर आमचे वर्चस्व आहे. आयोगाने कागद पत्रांची छाननी करावी, आम्ही ती करायला तयार आहोत. शिवसेनेची घटना घेऊनच शिंदे आपले पद अधिकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची बाजू मांडली. 'आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. आमच्याकडे संख्याबळ आहे. आमदार, खासदारांचे बहुमत जास्त असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय लवकर घ्या, अशी मागणी जेठमलानी यांनी केली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde News, ShivSena News
Shivsena Symbol Row : सिब्बलांनी केली शिंदे गटाची कोंडी; कागदपत्रे खरी असतील तर ओळख परेड करा...

तसेच लोकप्रतिनिधींसह एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला तर तो बेकायदेशीर कसा, असा सवला त्यांनी उपस्थित केला. शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रूटी नाही, ठाकरे गटाचा आरोप चुकीचा असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. मोठ्या संख्येने पक्षातून लोकप्रतिनिधी बाहेर पडतात, यात तथ्य आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले. चिन्हाच्या लढाईत पुढची सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com