Lok Sabha : पत्र देण्याच्या आदल्या दिवसापासूनच शेवाळेंची गटनेता म्हणून नियुक्ती!

खासदार विनायक राऊतांकडून हा दावा करण्यात आला आहे.
Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News
Rahul Shewale News in Marathi, Shiv sena NewsSarkarnama

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी (ता. 19) मान्यता दिली आहे. पण आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे समर्थक खासदारांनी अध्यक्षांना 19 जुलै रोजी पत्र दिलं असताना लोकसभा सचिवालयाने शेवाळे यांचा गटनेता म्हणून उल्लेख 18 जुलैपासूनच केला आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी याबाबतची सर्व पत्र समोर आणली आहेत. राऊत यांनी गुरूवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आम्ही 18 जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन गटनेते पदावर दावा सांगण्यात आला तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. 19 जुलै रोजीही त्यांना भेटून पत्र दिलं.

Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News
Ramdas Athawale : शरद पवारांबाबतचा रामदास कदमांचा दावा आठवलेंनी खोडून काढला!

लोकसभेच्या पोर्टलवर 20 तारखेला शेवाळे यांच्या गटनेतापदी नियुक्तीचे पत्र आलं आहे. पण आम्हाला 19 तारखेला हे पत्र मिळालं. तर प्रत्यक्षात पक्षाच्या स्थितीबाबतची लोकसभेतील यादी 18 जुलै रोजीची आहे. त्यात शेवाळे हे गटनेता असल्याचे म्हटलं आहे. याचा अर्थ त्यांनी आधीच निर्णय घेऊन ठेवला होता, असा आरोप राऊतांनी केला आहे.

लोकसभा सचिवालयाने 19 जुलैला पत्र काढून 18 जुलैपासून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली आहे. हे कृत्य त्यांच्या कोणत्या नियमात बसते, याचे आकलन होत नाही. त्यांना बंडखोर गटाचा गटनेता बनवायचाच होता तर ज्यादिवशी पत्र दिले त्यादिवसापासून नियुक्ती करायला हवी होती.

Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News
NCP : मोठी बातमी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील विभाग, सेल बरखास्त

पण त्यांनी आदल्यादिवसापासूनच ही नियुक्ती पत्रात दाखवली आहे. त्यामुळे पक्षपाती झाला असल्याची शंका शिवसेना खासदारांमध्ये आहे. याबाबत आम्ही लोकसभा अध्यक्षांना लेखी विचारणा करणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com